तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. त्यानंतर आता परीक्षेत सर्व्हर डाऊन असल्याची समस्या येत आहे. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या पेपरसाठी उमेदवार परीक्षा केंद्रावर गेले असता सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने ९ वाजल्या नंतरही विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवण्यात आले होते.
त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातला. नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील केंद्राबाहेर हा प्रकार घडला. असाच प्रकार अमरावतीमध्येही घडल्याची माहिती आहे. या प्रकाराने परीक्षार्थींमध्ये पुन्हा एकदा सरकारविरोधात वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू असून, या परीक्षेतील विघ्न काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आल्यावर, आज सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत.
कर्तृत्वाचा सन्मान! महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान
त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी पुण्याच्या विद्यार्थ्याचा औरंगाबादेत अन् औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.
कर्तृत्वाचा सन्मान! महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरती केली जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षा देत नाहीत.
Share your comments