राज्यात काल अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामूळे पीकांचे नुकसान झाले आहे. राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये गेले दोन ते तीन दिवस पावसानं हजेरी लावली आहे. या परतीच्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. ऐन भात कापणीच्या मोसमात पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामूळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ट्वीटद्वारे रोहित पवार यांनी सरकारला केली आहे.
मंगळवारी लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तसेच बुधवारी रात्री हलका पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील किल्लारी, कासार शिर्शी, लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, उदगीर या भागात पावसाच्या हलक्या सरीं बरसल्या आहेत. यामुळे वातावरणात अचानक गारवा वाढल्याने याचा परिणाम भात, द्राक्षांसह कापूस पिकांवर होताना दिसत आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात काल पडलेला अवकाळी पाऊस हा रब्बी हंगामातील पिकांसाठी फायदेशीर असला तरी कापलेलं भात पीक आणि द्राक्ष वेलीवर आलेली कोवळी फूट याला मोठा फटका बसला आहे. शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ही विनंती असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
Share your comments