या वर्षीचा खरीप हंगाम अतिवृष्टी मुळे आणि पूरस्थिती मुळे तर पूर्णपणे वाया गेलास होता परंतु शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभ्याकेलेल्या रब्बी हंगामातही सतत ढगाळ वातावरण, सतत थोड्या दिवसांच्या अंतराने येणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.
अशातच अशा वातावरणामुळे मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके वाया जात आहेत. तसेच त्यांच्या व्यवस्थापनावर अतोनात खर्च होत आहे. अशा परिस्थितीत वर्धा जिल्हा कृषी विभागाने तत्परता दाखवत वर्धा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल दोनच दिवसांमध्ये तयार केला व जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता.
या अहवालानुसार वर्धा जिल्ह्यामध्ये ते 30 टक्के पेक्षा अधिक चे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मदतीची वाट शेतकरी पाहत आहेत.
वर्धा जिल्ह्यातील बाधित पिकाची परिस्थिती….
जिल्ह्यामध्ये आठ आणि नऊ जानेवारीला अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. यामध्ये जवळ-जवळ 3000 हेक्टरच्या वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने अहवाल शासनाकडे पाठवला असून यामध्ये ते 30 टक्क्यांच्या वर नुकसान झाल्याचे दाखवण्यात आले आहे. या पावसाने शेती पिकांबरोबर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर तब्बल 650 हेक्टरच्या वर फळबागांना फटका बसलेला आहे. कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल तर सादर केला परंतु शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
Share your comments