खरीप व रब्बी पिकांसाठी राज्यात केवळ एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे या बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. रब्बी हंगामातील पिकांचा पिक विमा काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिश्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. रब्बी हंगाम पिक विमा 2023 करता शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पिक विमा भरण्यासाठी अर्ज सुरु करण्यात आले आहेत.
यामध्ये रब्बी ज्वारी, रब्बी गहू, रब्बी हरबारा, कांदा याच मध्ये उन्हाळी भात आणी भूईमुग या सर्व पिकांचा पिक विमा भरण्यास सुरवात झाली आहे. रब्बी ज्वारी करता 30 नोहेंबर 2023 पर्यंतची अंतिम मुदत ही देण्यात आली आहे . याच प्रमाणे गहू बागायत आणी हरबरा बागायत इत्यादी पिकांसाठी 15 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील, तर उन्हाळी भात आणि भूईमुग या पिकांसाठी भरता येणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.
तसेच या योजनेतील सहभागासंदर्भात शेतकऱ्यांना अडचण तसेच सामूहिक सेवा केंद्राने अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, नजिकची बँक, तहसीलदार/तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
Share your comments