1. बातम्या

शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी विक्री व्यवस्था निर्माण करणार

मुंबई: सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांनी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्री व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि मुंबई सहकारी संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचतगट यांनी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्री व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि मुंबई सहकारी संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. मंत्रालयात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि अपना बाजार, सहकारी भांडार व कळवा सहकारी बाजार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

राज्यातील विविध सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी बचत गट यांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांचे महामंडळामार्फत मार्केटिंग केले जात आहे. यापूर्वी पंजाब मार्कफेड येथे अशा संस्थांसोबत सदर उत्पादने विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. महाफार्म उत्पादनांमध्ये हळद पावडर, काजू पूर्ण, काजू तुकडा, कांदा लसुण मसाला, कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, काळा मनुका इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे. भविष्यात अजूनही जास्त उत्पादने बाजारात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मिलिंद आकरे, अपना बाजार संस्थेचे चेअरमन श्रीपाद पाठक, सहकारी भांडार या संस्थेचे चेअरमन संजय शेटे, कळवा बाजारचे एन. जी. गायकवाड उपस्थित होते.

English Summary: Creating Market system for farmers production Published on: 10 July 2019, 07:58 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters