1. बातम्या

Makar Sankranti : मकर संक्रांतीनिमित्ताने मोदींकडून गायींना चारा; जाणून घ्या गाई कोणत्या जातीची?

Punganur cow : आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील एका डॉक्टरने १४ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर पुंगनूर गायीची जात सुधारली आहे. सर्वात लहान गाय असल्याचा विक्रम पुंगनूर येथे आहे. या वैद्य यांनी जात सुधारल्यानंतर अडीच फुटांची पुंगनूर गाय विकसित केली आहे. त्यांनी या गायीला मिनिएचर पुंगनूर असे नाव दिले. मात्र, पुंगनूरची सर्वसाधारण उंची तीन ते पाच फूट आहे. तर लघु पुंगनूरची उंची अडीच फुटांपर्यंत आहे.

Pm modi news

Pm modi news

Punganur cow : संपूर्ण देशात मकर संक्रांतीचा सण आनंदात साजरा केला जातोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गायींना चारा खायला घातला आहे. गायींना चारा खायला घातल्याचे फोटो पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. हिंदू संस्कृती आणि सभ्यतेनुसार एका शुभ दिवशी मातेची पूजा केली जाते आणि तिला चारा दिला जातो. अशा परिस्थितीत मकर संक्रांतीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी या खास पुंगनूर जातीच्या गायींना चारा खायला घातला आहे.

Punganur cow

Punganur cow

मकर संक्रांतीनिमित्त मोदींनीकडून गायींना चारा
पंतप्रधान मोदींचे गायीबद्दलचे प्रेम समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी वारंगल शहरातील भद्रकाली मंदिरात गायीची सेवा करताना दिसले होते. पंतप्रधान मोदी प्रेमाने गायीला गूळ आणि गवत खाऊ घालत असल्याचे चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या आजूबाजूला गायींचा कळप दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी गायींना जवळ घेतल्याचे देखील काही फोटोतून दिसत आहे.

गायीची पुंगनूर जात कोणती?
आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील एका डॉक्टरने १४ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर पुंगनूर गायीची जात सुधारली आहे. सर्वात लहान गाय असल्याचा विक्रम पुंगनूर येथे आहे. या वैद्य यांनी जात सुधारल्यानंतर अडीच फुटांची पुंगनूर गाय विकसित केली आहे. त्यांनी या गायीला मिनिएचर पुंगनूर असे नाव दिले. मात्र, पुंगनूरची सर्वसाधारण उंची तीन ते पाच फूट आहे. तर लघु पुंगनूरची उंची अडीच फुटांपर्यंत आहे. जातीच्या सुधारणेनंतर ही जात विकसित करणाऱ्या डॉक्टरांचे नाव आहे डॉ. कृष्णम राजू असे आहे.

दूध उत्पादन किती?
पुंगनूर गायीचे सरासरी दूध उत्पादन १ ते ३ लिटर प्रतिदिन असते. एका दिवसात गायीला ५ किलो चारा लागतो. किंवा त्या खातात. पुंगनूर गायीचे सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे ही जात दुष्काळ प्रतिरोधक आहे. पुंगनूर गायींची संख्या १३ हजार २७५ आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे देशात सर्वात कमी संख्या असलेल्या गायींच्या जातींमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर आपण कमी संख्येने गायींच्या जातींबद्दल बोललो, तर बेलाही जातीच्या गायींची संख्या सर्वात कमी ५ हजार २६४ आहे. दुसऱ्या क्रमांकावर पानीकुलम गायी आहेत त्यांची संख्या १३ हजार ९३४ आहे.

English Summary: Cows are feed by Modi on the occasion of Makar Sankranti Punganur cow Published on: 15 January 2024, 06:35 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters