राज्यात कापसाची लागवड ही दरवर्षापेक्षा यावर्षी थोडी कमी बघायला मिळतेय, खांदेश प्रांतात देखील याची लागवड ही लक्षणीय कमी झाली आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन हे साहजिकच कमी झाले, आणि कापसाला सुरवातीला दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला, तेव्हा मागणी जास्त आणि पुरवठा कमी असे चित्र होते. पण आता जवळपास एक महिना उलटला पण कापसाचे दर कमीही होत नाही आणि वाढतही नाहीत, कापसाच्या दरात भयानक स्थिरता बघायला मिळत आहे. शिवाय व्यापाऱ्यांनी कापुस खरेदी करण्याला चांगलाच संयम ठेवला आहे, त्यामुळे मागणी नसल्याने शेतकऱ्यांणा कापुस विक्रीसाठी अडचण निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी सोयाबीनच्या बाबतीत देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात विक्री करावी का भंडारण करावे असा संभ्रम निर्माण झाला होता.
आता कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात देखील अशाच विचारांचे काहूर थैमान घालत आहे. शिवाय राज्यातील कापुस वेचणी ही अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे कापसावर गुलाबी बोन्ड अळी हल्ला चढवीत आहे, म्हणुन वावरात शिल्लक राहिलेल्या कापसाचा दर्जा हा कमालीचा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कापसाच्या दरात असलेली कमालीची स्थिरता आणि मागणीत झालेली घट यामुळे कापसाचे भविष्यात काय दर राहतील याबाबत शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे.
कापसाला यंदा मिळाला असा भाव
यंदा कापसाच्या खरेदीचा बिगुल वाजला आणि कापसाला तब्बल दहा हजार रुपयापर्यंत बोली लागली, एवढा विक्रमी भाव याआधी कापसाला कधीच मिळाला नव्हता. रेट विक्रमी असतानादेखील कापसाच्या खरेदीसाठी व्यापार्यांची गर्दी मावत नव्हती. सुरुवातीला कापसाला मागणी जास्त होती मात्र पुरवठा हा त्यामानाने खूपच नगण्य होता, त्यामुळे कापसाचे व्यापारी खेडोपाडी फिरत कापूस खरेदी करीत होते. मात्र मध्यंतरीच्या काळात ओमीक्रोन नावाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी ही लक्षणीय घटली तसेच निर्यातीवर देखील प्रॉब्लेम आला, त्यामुळे शेवटच्या टप्प्यात असलेल्या कापसाला कमी रेट मिळत आहे. आता कापूस मात्र आठ हजार रुपये क्विंटल वर येऊन ठेपला आहे.
आता शेतकऱ्यांनी काय करावे
कापसाची वेचणी ही अंतिम टप्प्यात आहे, आता भविष्यात कापसाचे दर काय राहतील हे तर भविष्यातच समजेल. त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सावध पवित्रा अंगीकारून जेवढी गरज आहे तेवढाच कापसाची विक्री करावी आणि बाकीचा कापूस स्टोअर करून ठेवावा. मात्र संपूर्ण कापूस स्टोअर करून फायदा होणार नाही. जर असे केले तर दर घसरले तरी नुकसान हे कमी होईल आणि वाढलेत तरी थोडा का होईना फायदा हा निश्चित आहे.
Share your comments