राज्यात खूप मोठ्या क्षेत्रावर कपाशी लागवड केली जाते, राज्यातील खानदेश प्रांत कपाशी साठी विशेष ओळखला जातो, खान्देश समवेतच मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड बघायला मिळत असे. मात्र गेल्या काही वर्षापासून खानदेश समवेतच मराठवाड्यात देखील कपाशीच्या क्षेत्रात कमालीची घट नोंदविण्यात आली आहे. मराठवाड्यात विशेषता बीड जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय होते. या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कापसाच्या पिकावर अवलंबून होते. खानदेशात तसेच बीड जिल्ह्यात देखील कपाशीची लागवड जास्त करून कोरडवाहू जमिनी वर नजरेस पडत असे. मात्र कपाशी साठी येणारा खर्च आणि कापसाच्या बाजार भावात होत असलेली घट यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या लागवडी पेक्षा इतर नगदी पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिलेले दिसत आहे. आता आणि कापूस उत्पादक शेतकरी कापसाऐवजी सोयाबीन पिकाला महत्त्व देताना दिसत आहेत तसेच सोयाबीन पिकाचे क्षेत्र देखील कमालीचे वाढताना दिसत आहे.
जर आपण मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचा विचार केला तर एकट्या माजलगाव तालुक्यात बीड जिल्ह्याच्या एकूण कापूस उत्पादनापैकी 40 टक्के उत्पादन घेतले जात असे. मात्र यावर्षी तालुक्यात मात्र वीस हजार हेक्टरवर कपाशी लागवड नजरेस पडत आहे म्हणजे यावर्षी तालुक्यातील कापसाच्या क्षेत्रात लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. कापसाच्या क्षेत्रात घट तर झालीच शिवाय अवकाळी व अतिवृष्टीमुळे कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला आणि त्यामुळे कापसाच्या उत्पादनात कमी आली. परिणामी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी दर प्राप्त झाला मात्र दर प्राप्त होऊनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाहीये. दर जरी दहा हजाराच्या घरात असले पण शेतकऱ्यांच्या घरातच कापूस नाही त्यामुळे वाढलेल्या बाजारभावाचा काही फायदा होताना दिसत नाहीये. मात्र असे असले तरी अनेक कापूस उत्पादक शेतकर्यांचा यामुळे फायदा देखील होत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली नाही त्या शेतकऱ्यांना पश्चाताप होताना दिसत आहे.
कापसाच्या क्षेत्रात घट होण्याची कारणे
शेतकरी मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात कपाशी लागवड हजारो हेक्टर क्षेत्रावर बघायला मिळत होती. पूर्वी अनेक शेतकरी सोयाबीन पेक्षा कपाशी लागवडीला पसंती दर्शवित असतात. कपाशी लागवड करण्यामागे शेतकरी बांधव असे कारण सांगत असत की, कपाशीच्या काढणीच्या हंगामात त्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध होऊन जात असे. पण गेल्या काही वर्षात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने, व कापसाच्या बाजारभावात सातत्याने उतारती कळा लागल्याने शेतकरी बांधवांनी कापसाऐवजी सोयाबीन पिकाला पसंती दर्शवली.
आणि संपूर्ण जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र घटत जात असून सोयाबीन पिकाचे क्षेत्र लक्षणीय वधारत आहे. तसेच खानदेश मध्ये देखील अशीच परिस्थिती आहे खानदेश मध्ये देखील कापसाचे क्षेत्र हळूहळू कमी होताना दिसत आहे आणि त्याऐवजी तेथील कापूस उत्पादक शेतकरी इतर नगदी पिकांना प्राधान्य देताना दिसत आहेत. शिवाय कापसाचे फरदड घेतल्याने शेत जमीन नापीक होत असे हे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी कापसाचे पीकच न घेण्याचा विचार केला त्यामुळे देखील कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे सांगितले जाते.
Share your comments