1. बातम्या

कापूस, हळद ,मक्याच्या भावात मोठी घसरन ,जाणून घ्या सविस्तर माहिती

शेतकरी वर्गाच्या वाट्याला नेहमी वेगवेगळी संकट येतातच. यामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, रोगराई आणि कीड आणि वाढत्या खतांच्या किमती यामुळे शेतकरी वर्ग सतत संकटात सापडत असतो. शिवाय पिकांचे उतरते भाव यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडत आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे
cotton

cotton

शेतकरी(farmer) वर्गाच्या वाट्याला नेहमी वेगवेगळी संकट येतातच. यामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस(rain), रोगराई आणि कीड आणि वाढत्या खतांच्या किमती यामुळे शेतकरी वर्ग सतत संकटात सापडत असतो. शिवाय पिकांचे उतरते भाव यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडत आहेत.

उत्पादनात घट होऊन सुद्धा पिकांचे भाव कमी :

गेल्या वर्षी शेतकरी बांधवांचे अवकाळी पावसामुळे आणि थंडीमुळे(winter) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शिवाय पिकास उपयुक्त वातावरण नसल्यामुळे रोग, कीड यांचा सामना करावा लागला  आणि  उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट सुद्धा झाली. उत्पादनात घट  होऊन  सुद्धा  पिकांचे  भाव (price) हे पडलेच होते. यामुळे शेतकरी बांधवांना तोटा सहन  करावा  लागत आहे.मागील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात कापूस आणि  मकेच्या किमती चांगल्या होत्या  परंतु मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भावात उतरण सुरू झाली. मागील महिन्यापासून हळद, हरभरा, मूग, सोयाबीन व तूर ,कापूस आणि मका यांच्या भावात उतरण चालू झाली आहे. तसेच कांद्याची आवक वाढल्याने सुद्धा कांद्याच्या भाव मोठ्या  प्रमाणात पडलेले आहेत.

हेही वाचा:बैलाला शेतीकामाचे प्रशिक्षण कसं आणि कशाप्रकारे द्यावे, जाणून घ्या सविस्तर

कापूस:-

मे महिन्यातील 3 आठवड्यात कापसाचे भाव वाढत होते परंतु अखेरच्या आठवद्यापासून कापसाचे भाव उतरले आहेत.गेल्या आठवड्यात कापसाचे स्पॉट भाव हे २.५ टक्क्यांनी घसरले आहेत आणि भाव घसरुन ४८,८५० रुपयांवर पोहचले आहेत.परंतु जून च्या पहिल्याच आठवड्यात कापसाच्या भावात ३.४ टक्क्यांनी घसरन झाली आहे आणि भाव हा 48850 वरून थेट 47180 वर येऊन पोहचला आले. जुलै डिलिव्हरी भाव १.१ टक्क्याने घसरून रु. ४५,४३० वर येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा:वीज पडून होणारी जीवित हानी रोखण्यासाठी किंवा टाळण्यासाठी वापर ‘दामिनी’ हे ॲप, वाचा सविस्तर

मका:-

यंदा च्या वर्षी मकेच्या भावात जोरदार वाढ होताना दिसत होती परंतु गेल्या आठवड्यापासून मकेच्या भावात जोरदार घट झाली आहे. गेल्या 7 दिवसात मकेच्या भावात २.५ टक्क्यांची घसरन होऊन मकेच्या भाव हे 2240 वर आले आहेत. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी घसरून 2168 वर पोहचले आहेत.


हळद:-

हळदीच्या भावात मे महिन्यात घसरत सुरू झाली होती. या सप्ताहातहळदीच्या भावात 1.7 टक्क्यानी घट झालेली आहे आणि हळदीच्या किमती या 8238 वर येऊन पोहचल्या आहेत. वर आल्या आहेत.

English Summary: Cotton, turmeric, maize prices fall sharply, know the details Published on: 06 June 2022, 04:50 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters