ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि त्यानंतर झालेला बोंड आळी चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव या गोष्टीमुळे देशातील कापूस उत्पादनात मोठी घट आली. यावर्षी कापसाचे उत्पादन हे 360 लाख गाठी होईल असा अंदाज होता परंतु ते ही परिस्थिती उद्भवली यामुळे जास्तीत जास्त तीनशे दहा ते तीनशे पंधरा लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
कापसाचे जागतिक परिस्थिती
अमेरिकन कृषी विभागाने 2021-22 या हंगामात भारतात कापूस उत्पादनात घट होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच जगातील चीन, टर्की आणि पाकिस्तान मध्ये कापूस उत्पादन तेथील वापराच्या तुलनेत कमी राहणार आहे.त्यामुळे या देशांना कापसाच्या आयात करावी लागणार आहे. 2022 च्या जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात युएसडीए जागतिक कापूस उत्पादन 1209.6 लाख खंडी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एक खंडी हि 218 किलोची असते. तर जागतिक कापूस वापराचा विचार केला तर तो 1242.4 लाख खंडीवर पोचेल असा अंदाज जाहीर केले आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीत हा अंदाज सहा लाख गाठी नि कमी केला आहे.
जर चीन या देशाचा विचार केला तर या वर्षी तिथे 270 लाख खंडी कापूस उत्पादन होणार असून येथील कापूस वापर हा 395 लाख खंडीवर पोचणार आहे. म्हणजे तेथे ही कापूस उत्पादन आणि वापरामध्ये 25 लाख खंडिचा फरक आहे. पाकिस्तानचा विचार केला तर तेथे कापसाचे उत्पादन 58 लाख खंडीवर जाईल. परंतु तेथील कापूस वापर मात्र एकशे बारा लाख खंडिचा होणार आहे. म्हणजे तेथे ही कापूस वापर आणि उत्पादन यामध्ये दुप्पट तफावत आहे. जर टर्कीचा विचार केला तर तिथेही कापूस उत्पादन 38 लाख अंडी पोचण्याचा अंदाज आहे आणि तेथील कापसाचा वापर 85 लाख खंडीवर पोचण्याचा अंदाज आहे. तेथेही कापसाचे उत्पादन आणि वापर यामध्ये जवळजवळ बराच फरक आहे.
अमेरिकेमध्ये देखील या वर्षी कापूस उत्पादन 176 लाख गाठींवर पोहोचेल.तर वापर हा पंचवीस लाख गाठींच्या पुढे स्थिरावेल असे यूएसडीएने म्हटले आहे. आजच्या वर्षाचा विचार केला तर अमेरिकेची कापसाचे निर्यात ही 163.7 लाख खंडी एवढी झाली होती. चालू वर्षी ही निर्यात दीडशे लाख खंडी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अमेरिकेचे निर्यात देखील घटणार असा अंदाज आहे.
(सौजन्य-उत्तमशेती)
Share your comments