भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट अमेरिका मधून एक महत्त्वाचा आणि 'कभी खुशी कभी गम' या परिस्थिती मधला संदेश आला आहे. त्याचं झालं असं अमेरिका मध्ये तेथील कृषी खात्याने मागच्या महिन्याचा कापूस उत्पादन बाबतचा अहवाल जगापुढे मांडला आहे. या अमेरिकेच्या जानेवारी महिन्याच्या मासिक अहवालामुळे भारतातील ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिला आहे त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याचे कारण असे की, या अहवालात कृषी विभागाने भारतातील कापसाच्या उत्पादनात अजून घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कापसाच्या भावात अजून वाढ होईल का असा आनंदमय प्रश्न भारतातील ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिला आहे त्यांना पडला आहे. एकीकडे अमेरिकेच्या अहवालामुळे भारतातील कापसाच्या उत्पादनात घट झाली हे जरी दुखत असले तरी यामुळे बाजार भावात अजून वाढ होईल अशी शक्यता असल्याने देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये 'कही खुशी तो कही गम' बघायला मिळत आहे. अमेरिकन कृषी विभागानुसार, 277 लाख गाठींची उत्पादन भारतात होण्याची शक्यता होती. मित्रांनो कापसाची 218 किलोंची असते. मात्र नुकताच प्रसारित करण्यात आलेल्या एका ताज्या अहवालानुसार भारतात आता केवळ 274 कापूसच्या गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. तेलंगाना राज्यात नुकतेच अवकाळी पावसाने थैमान घातले होते याचाच परिणाम हा कापसाच्या उत्पादनात झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अहवालात देखील हेच कारण देऊन तज्ञांनी घट नमूद केली आहे. अहवालात अजून एक महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यात आली आहे, अहवालात म्हटलंय की 2021- 22 व्या वर्षात भारताच्या कापूस वापरात मोठी वाढ होऊ शकते. ही वाढ सुमारे पाच लाख गाठीनी वाढण्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात अमेरिकेने जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं होतं की भारतात सुमारे दोनशे साठ लाख कापूस गाठीचा वापर होईल. मात्र आता या नव्याने जाहीर केलेल्या अहवालात पाच गाठींची वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यासंदर्भात टेक्सटाइल इंडस्ट्रीज मधल्या व्यापाऱ्यांच्या मते, भारतातून कापड आणि कपड्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली असल्याने मिलमध्ये कापसाचा वापर वाढू शकतो. तसेच निर्यातमुळे व्यापाऱ्यांना चांगला फायदा झाला असल्याने मिल मालक अतिरिक्त कापसाचा साठा करून ठेवू शकतात. या अहवालामध्ये भारत 59 लाख कापूस गाठींची निर्यात करू शकतो असे देखील नमूद करण्यात आले आहे. भारताच्या एकूण कापूस निर्यातपैकी सुमारे 60 टक्के कापसाची निर्यात ही आपले शेजारी राष्ट्र बांगलादेश मध्ये होत असते.
बांगलादेश व्यतिरिक्त व्हिएतनाम चीन आणि इंडोनेशिया या राष्ट्रांकडून देखील कापसाची मागणी होऊ शकते. अमेरिकेत प्रकाशित झालेल्या या अहवालामुळे कापसाच्या बाजार भावात आगामी काही दिवस सातत्य बघायला मिळू शकते. तसेच अनेकांना कापसाच्या बाजार भावात मामुली वाढ होण्याची देखील आशा आहे. एकंदरीत अमेरिकेत प्रकाशित झालेला हा अहवाल कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा आशादायी सिद्ध होत आहे.
Share your comments