1. बातम्या

ही परिस्थिती आहे कारणीभूत कापसाचे दर स्थिर ठेवण्यासाठी

यावर्षी अतिवृष्टीमुळे आणि उद्भवलेल्या गंभीर पूरस्थिती मुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. त्याला कापूस हे पीक देखील अपवाद नाही. कापसाचे देखील यामुळे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the cotton

the cotton

यावर्षी अतिवृष्टीमुळे आणि उद्भवलेल्या गंभीर पूरस्थिती मुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले. त्याला कापूस हे पीक देखील अपवाद नाही. कापसाचे देखील यामुळे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले.

तसेच वेचणीच्या टप्प्यांमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात आणखी घट झाली. परंतु यावर्षी कापसाचे कमी उत्पादन आणि स्थानिक आपण उद्योगाकडून मागणी झालेली वाढ या गोष्टींमुळे कापूस भाव तेजीत आहेत.यावर्षी संपूर्ण देशातील कापसाचे उत्पादन हे 315चे 340 गाठींच्या दरम्यान स्थिर राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी कापड उद्योग जगतातून व्यक्त केला जात आहे. जागतिक बाजारपेठेत देखील कापसाची मागणी प्रचंड वाढलेली आहे.

परंतु त्या मानाने कापसाच्या पुरवठा हा नगण्य आहे. यावर्षी महाराष्ट्र सोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात देखील उत्पादनाला प्रचंड असा फटका बसल्याने उत्पादनात घट आली असल्याचे चर्चा आहे.

 कापसाचा बांगलादेश हा मोठा आयातदार……

 भारतामधील कापूस भाव हे आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये असलेल्या भावापेक्षा जास्त आहेत. परंतु बांगलादेश आणि पाकिस्तानातील काही कापड उद्योग आपले करार पूर्ण करण्यासाठी कापूस आयात करत आहेत. बांगलादेशला भारतीय कापूस अमेरिकेच्या कापसा पेक्षा पाच ते दहा टक्‍क्‍यांनी महाग पडत आहे. तो भारतातून आतापर्यंत झालेल्या एकूण कापूस निर्यात यापैकी तब्बल 70 टक्के कापूस बांगलादेशला निर्यात  झाल्याचे जाणकारांनी सांगितले.

यामागे महत्त्वाचे कारण असे आहे की बांगलादेशला भारतीय कापसाचीआयात ही सोपी होते तसेच मालवेळेवर मिळण्याची शाश्वती असते. तसेच वायदे बाजारात कापसाचे वायदे सुधारून 116.080 सेंड प्रति पाउंड झाले आहेत. तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर कापसाचे व्यवहार 35 हजार 400 रुपये प्रति टन झाले आहेत. याचा परिपाक म्हणजे कापसाचे भाव टिकून राहण्यासाठी ही परिस्थिती मजबूत आहे.(स्त्रोत-ॲग्रोवन)

English Summary: cotton rate stable they are some reason behind that situation Published on: 13 January 2022, 05:36 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters