खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील जवळपास सर्वच पिकांना मोठा फटका बसला होता. खरिपात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त फटका मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला बसला यामुळे कापसाच्या उत्पादनात विक्रमी घट घडणार हे फिक्स होते. उत्पादन कमी झाले असल्याने कापसाच्या दरात सहाजिकच वाढ होणार असल्याचा अंदाज कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होता.
शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे कापसाच्या दरात वाढ देखील होत राहिली परंतु कापसाच्या दरात हंगामाच्या सुरुवातीपासून हळूहळू वाढ होत राहिली यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना कापसाची विक्री सुरू ठेवली होती.
आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला विक्रमी दर मिळत आहे मात्र या दराचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाचं अधिक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण की, कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेला कापूस आधीच विक्री झाला असून आता या वाढत्या दराचा फायदा केवळ आणि केवळ व्यापाऱ्यालाचं होताना दिसत आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट एपीएमसी मध्ये कापसाला सोमवारी या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी दर मिळाला. सोमवारी एपीएमसीमध्ये कापसाला 11 हजार 845 रुपये प्रतिक्विंटल एवढा विक्रमी दर मिळाला असल्याचे सांगितले जातं आहे.
शेतकऱ्यांकडे असलेला कापूस कधीच विक्री झाला असून आता या वाढत्या दराचा फायदा व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे सांगितले जातं आहे. शेतकरी बांधवांनी कापूस पिकातून चांगले उत्पन्न प्राप्त करण्यासाठी चार महिने अहोरात्र काबाडकष्ट केले मात्र त्यांना त्याचा उचित मोबदला मिळाला नसून केवळ महिन्याभरातचं व्यापाऱ्यांना कापसातून जंगी कमाई होत असल्याचे दिसत आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने त्राहिमाम् माजवला होता यामुळे सोयाबीन समवेतच कापूस पिकाला मोठा फटका बसला. अवकाळी मुळे कापसाचे उत्पादन घटणार हे भाकीत आधीच सांगितलं गेले होते.
असे असतानाच कापूस पीक अंतिम टप्प्यात आले असता राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण बनले असल्याने कापसाचे उत्पादन चक्क निम्म्याने कमी झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कापसाला चांगला बाजारभाव मिळेल हे ठरलेलं होतं आणि अपेक्षेप्रमाणे कापसाला चांगला विक्रमी दर देखील मिळाला. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे एवढे नक्की.
संबंधित बातम्या:-
आनंदाची बातमी: अंतिम टप्प्यात फरदड कापसाला सोन्यासारखा भाव, मात्र; कृषी वैज्ञानिकांच्या मते…….!
आनंदाची बातमी! लवकरच रंगीत कापुस वावरात दिसणार; शास्त्रज्ञांनी केला रंगीत कापूस विकसित
Share your comments