1. बातम्या

कपाशीला मिळतोय हमीभावापेक्षा दीडपट अधिक बाजार भाव; मात्र, तरीही कापूस उत्पादक शेतकरी कापूस विक्री करण्यास आहेत नाखूष

सध्या राज्यात सर्वत्र कपाशीचे बाजार भाव गगन भरारी घेत आहेत, वाशीम जिल्ह्यात कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव प्राप्त होत आहे. वाशीम जिल्ह्यात समवेतच संपूर्ण राज्यात कापसाला असाच विक्रमी बाजार भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या कापसाला मिळत असलेला बाजार भाव हा शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा दीडपट अधिक असल्याचे सांगितले जात आहे. कापसाला जरी कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळत असला तरीदेखील कापूस उत्पादक शेतकरी सध्या कापूस विक्री करण्याच्या मूडमध्ये बघायला मिळत नाहीत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
cotton market

cotton market

सध्या राज्यात सर्वत्र कपाशीचे बाजार भाव गगन भरारी घेत आहेत, वाशीम जिल्ह्यात कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव प्राप्त होत आहे. वाशीम जिल्ह्यात समवेतच संपूर्ण राज्यात कापसाला असाच विक्रमी बाजार भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या कापसाला मिळत असलेला बाजार भाव हा शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा दीडपट अधिक असल्याचे सांगितले जात आहे. कापसाला जरी कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळत असला तरीदेखील कापूस उत्पादक शेतकरी सध्या कापूस विक्री करण्याच्या मूडमध्ये बघायला मिळत नाहीत.

जिल्ह्यात कापसाची आवक ही सर्वच बाजारपेठेत मंदावलेली दिसत आहे. कृषी तज्ञांच्या मते, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाच्या बाजार भावात अजून दरवाढ होण्याची आशा आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मते या वर्षी कापसाला तब्बल 15 हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर प्राप्त होऊ शकतो. यामुळेच जिल्ह्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याजवळ शिल्लक असलेला कापूस विक्री करण्यापेक्षा साठवणूक करण्याला जास्त महत्त्व दिले आहे. वाशीम जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली. असे असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे या एवढ्या मोठ्या क्षेत्रातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन प्राप्त झाले नाही.

उत्पादनात घट तर होतीच याशिवाय शासनाने देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आणि लांब धाग्याच्या कापसाला केवळ 6 हजार 25 रुपये तर मध्यम धाग्याच्या कापसाला पाच हजार 725 एवढाच नाम मात्र हमी भाव जाहीर केला. असे असले तरी, खरीप हंगामात कपाशीच्या उत्पादनात घट झाली देशांतर्गत कापसाच्या उत्पादनात घट तर झालेच याशिवाय प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कापसाची गट नमूद करण्यात आले त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कापसाची मागणी लक्षणीय वधारली परिणामी कापसाचे बाजार भाव गगन भरारी घेऊ लागले. सध्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा दीडपट अधिक दर कापसाला मिळत आहे मात्र उत्पादनात झालेली घट आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे या दरातही कापूस विक्री करण्यास परवडत नसल्याचे कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आगामी काही दिवसात कापसाचा अजून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने कापसाचा बाजार भावात अजून वाढ होण्याची आशा आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडे शिल्लक असलेला कापूस साठवणूक करून ठेवला आहे परिणामी बाजारपेठेत कापसाची आवक मंदावली आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, अद्यापही अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस शिल्लक आहे मात्र दरवाढीची आशा असल्याने कापूस उत्पादक शेतकरी कापूस विक्री करण्यास तयार नाहीत.

English Summary: cotton rate are reached 10000 per quintal but farmers still are not selling Published on: 04 February 2022, 04:06 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters