कापूस खरेदी दिवाळी च्या शुभ मुहूर्तावर सुरू होणार आहे. त्यामुळे आता कापसाला चांगला भाव मिळावा असे अपेक्षा आहे. कापूस उत्पादकांना याचा फायदा होईल. पणन महासंघाच्या असलेल्या 50 केंद्रांवर तसेच सीसीआयच्या 74 केंद्रांवर कापूस खरेदी प्रक्रिया केली जाणार आहे.
विशेष म्हणजे चांगल्या दर्जाच्या कापसाला सहा हजार 25 असा हमी भाव मिळणार आहे.
शेतकरी बंधूंसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्यातील 116 तालुक्यात 124 कापूस खरेदी केंद्र आहेत.या कापूस खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया पणन महासंघाकडून सुरू करण्यात येणार आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे.
त्यामुळे कापूस शिल्लक आहे त्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वाळवलेल्या कापूस घेऊन येण्यासाठी सूचना दिलेला आहेत. हा कापूस खरेदी केंद्रावर आणताना बैलगाडी, ट्रॅक्टर व चार चाकी मध्ये घेऊन येण्यास सांगितले आहे.
कापूस विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे
- कापूस विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांनी कापूस पिकाची नोंद असलेला अद्यावत सातबारा सोबत न्यावा.
- जनधन बँक खाते असलेल्या बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणू नये, च्या ऐवजी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेल्या पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी. त्यामध्ये बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड स्पष्ट दिसेल.
- कापूस विक्री केल्याच्या आठ दिवसात कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
Share your comments