राज्यात जवळपास सर्वच भागात खरीप हंगामासाठी कपाशी लागवड केली जाते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात कपाशी लागवड केली गेली होती. आता खरीप हंगामातील कपाशीचे पीक अंतिम टप्प्यात आले असून उत्पादन व उत्पन्न याचे गणित खूपच वेगळे आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने हाहाकार माजवला होता, यामुळे कपाशी समवेतचइतर अनेक खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
वातावरणात झालेल्या मोठ्या बदलामुळे कापूस पिकावर बोंड आळीचे सावट संपूर्ण हंगामभर कायम राहिले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती, उत्पादनात घट झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पदरी किती उत्पन्न येते याबाबत संभ्रम अवस्थेत होता. मात्र, या हंगामात उत्पादनात घट झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वधारल्याने कधी नव्हे तो कापसाला विक्रमी दर प्राप्त झाला, त्यामुळे उत्पादनातील घट कापसाच्या दराने भरून काढली. या हंगामात कापसाला शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा देखील अधिक दर प्राप्त झाला आहे. त्यामुळे या हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वजा जाता थोडेफार उत्पन्न पदरी पडल्याचे दिसत आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कापसाला शासनाने 5 हजार 925 प्रतिक्विंटल असा हमीभाव ठरवून दिला आहे, मात्र या हंगामात कापसाला याच्या दुपटीने म्हणजे जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त झाला आहे. उत्पादनात देखील कधी नव्हे एवढी घट झाली, तसेच बाजार भाव आज देखील कधी नव्हे ती विक्रमी तेजी या हंगामात बघायला मिळाली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आनंदी असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात नजरेस पडत आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, पावसाच्या लहरीपणामुळे आणि बोंड अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात जरी घट झाली असली, तरी कापसाला मिळत असलेला विक्रमी बाजार भावामुळे उत्पादनाची घट भरून निघत आहे. त्यामुळे खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली असली तरी उत्पन्नामध्ये मात्र भरघोस वाढ झाली आहे. याआधी कधीच कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर प्राप्त झाला होता, वाढत्या दरामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावत नाहीये.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, कापसाच्या बाजार भावात येत्या काही दिवसात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी कापूस उत्पादक शेतकरी मालामाल होत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात कायम आहे.
Share your comments