सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी २०२०-२१ च्या कापूस खरेदी हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. भारतीय कॉटन कॉर्पोरेशन (CCI) आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाला (MSCCGF) हंगामाच्या सुरूवातीपासूनच समन्वयाने खरेदीचे नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ मागील हंगामापासूनच मनुष्यबळाच्या कमतरतेबाबत तक्रार करीत आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ हंगामात महाराष्ट्राला ४५० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित असून ४२.०७ लाख हेक्टर वर पिकाची लागवड होईल, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. प्रत्येक खरेदी केंद्रांवर किमान एक ग्रेडर असला पाहिजे आणि कापूस खरेदी करण्यापूर्वी आवश्यक मनुष्यबळ कृषी विभागाने उपलब्ध करुन द्यावे अशी सूचना सुद्धा त्यांनी दिली .
राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघ मागील हंगामापासूनच मनुष्यबळाच्या कमतरतेबाबत तक्रार करीत आहे. मनुष्यबळा अभावी मागील हंगामात कापूस खरेदीदरम्यान त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीस उपस्थित असलेले कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) चे सीएमडी पीके अग्रवाल म्हणाले की, मॉन्सूमध्ये बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता राज्य सरकारच्या अधिकऱ्यांनी नमूद केली होती. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून खरेदी सुरू होण्याची शक्यता वर्तवली होती . गुजरात व महाराष्ट्रातील काही भागातून सध्या अस्तित्त्वात असलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे अहवाल नोंद करण्यात आली आहे. पण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता आहे.
CCI सीसीआयच्या मापदंडांनुसार खरेदी केलेल्या कापसामध्ये १२% पेक्षा जास्त आर्द्रता नसावी असे ते म्हणाले. सध्या बाजारात प्रश्न कापूस सामान्य दर्जाच्या आहे. आणि किंमती एमएसपीच्या अगदी खाली आहेत. सीसीआयने आता ६० खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. तर महाराष्ट्र महासंघाने ३० खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या हंगामात सरकारने जाहीर केलेले मध्यम स्टेपल कपाशीचे एमएसपी प्रति क्विंटल ५५१५ रुपये आहे तर उत्तम दर्जाच्या कपाशीचे ५८२५ रुपये आहे.
Share your comments