खरीप हंगामातील मुख्य पीक कापूस आणि सोयाबीन या हंगामात कधी नव्हे तो चांगलाच तेजीत बघायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनी व्यापाऱ्यांची भूमिका स्वीकारली असल्यामुळे कापसाला विक्रमी दर मिळत आहे. शेतकरी बांधव ज्या प्रमाणे शेतमाल पिकवू शकतो त्याप्रमाणे तो विक्रीदेखील करू शकतो याचाच प्रत्यय कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या हंगामात दाखवून दिला आहे. कापसाचे बाजार भाव ठरवण्यासाठी कापूस उत्पादक शेतकरी एक प्रमुख सूत्रधार म्हणून उदयास आले आहेत. जेव्हा बाजारपेठेत कापसाला अपेक्षित असा बाजार भाव प्राप्त झाला त्याच वेळी कापसाची विक्री करायची अन्यथा कापसाची साठवणूक करणे यावरच आपले लक्ष केंद्रित करायचे असे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मनाशी ठरवून घेतले होते.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ठरवल्याप्रमाणेच योग्य दर मिळाला तर विक्री केली नाहीतर कापसाची साठवणूक करण्यास पसंती दर्शवली, या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सावध शहाणपण्यामुळे कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला आहे. कापसाच्या बाजारपेठेतील चित्र बघता दिवसेंदिवस कापसाची मागणी वाढलेली बघायला मिळत आहे त्यामुळे आगामी काही दिवसात कापसाचे बाजार भाव याच पद्धतीने तेजीत राहतील असा तज्ञांचा अंदाज आहे. कापसाला एवढी प्रचंड मागणी आहे की कापूस खरेदीसाठी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापार्यांच्या मध्ये कमालीची स्पर्धा बघायला मिळत आहे. कापूस व्यापाऱ्यांच्या मध्यात होणारी ही चढाओढ स्पर्धा शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची सिद्ध होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापूस साडे दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्टेबल असल्याचे बघायला मिळत आहे.
खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली, उत्पादनात जरी घट झालेली असलीं तरी बाजारपेठेत कापसाला उच्चांकी दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. खरीपात झालेल्या अतिवृष्टीमुळे हंगामातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते, केवळ कापुसच एक मात्र असे पिक होते ज्याने शेतकऱ्यांना मरणापासून वाचवले. बाजारपेठेत चांगला उच्चांकी दर मिळत असतानाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अजूनही भाववाढीच्या अनुषंगाने कापसाची साठवणूक केली आहे तर अनेक शेतकरी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करण्यास पसंती दर्शवीत आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या हंगामात मायबाप सरकारकडून देखील छुपा पाठिंबा मिळत असल्याचे समजत आहे, कारण की देशांतर्गत कापूस गाठींच्या मोठा तुटवडा भासत असूनही या हंगामात कापूस महामंडळाने कुठलाच हस्तक्षेप करणे गरजेचे समजले नाही.
मायबाप सरकारनेदेखील कापसाच्या दरात हस्तक्षेप केला नाही, व वाढत्या दराला ब्रेक लावण्याचे कार्य केले नाही. वाढत्या दरांना ब्रेक लावण्याऐवजी मायबाप सरकारने 17 हजार कोटी रुपये हमीभावाने कापूस खरेदी केलेला तोटा भरून काढण्यासाठी दिले. त्यामुळे मायबाप सरकारचा वाढत्या दाराला कायमच छुपा पाठिंबा असल्याचे समजत आहे. एकंदरीत या हंगामात सर्व समीकरणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याने कापसाला चांगला उच्चांकी दर मिळत आहे. सध्या राज्यात कापसाला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments