यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले. अगोदरपासूनच यावर्षी कापसाचे बाजार भाव तेजीत पाहायला मिळत आहेत. तर मागील पंधरा दिवसाचा विचार केला तर कापसाचे बाजार भाव तेजी चे वातावरण आहे.
यामागे तशी बरीच कारणे आहेत. पण काही कारणे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.
देशांतर्गत कापसाची मागणी वाढली
मागील काही दिवसांमध्ये दक्षिणेतील कापड लॉबीने बाजार भाव पाडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. याबाबतीत वस्त्रोद्योग मंत्री श्री पियुष गोयल यांनी कापूस निर्यात बंदी बाबत कापड व्यापाऱ्यांचा जो प्रस्ताव होता तो फेटाळून लावला. एवढेच नाही तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जर चांगला बाजारभाव मिळत असेल तर त्यामध्ये केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही असे ठणकावून सांगितले.या सगळ्या कारणांमुळे कापूस व्यापारी आणि खरेदीदारांना खुल्या बाजारातून कापूस खरेदी करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
तसेच भारतीय कापूस चीन आणि बांगलादेश सारख्या देशांमध्ये निर्यात करण्यात आला. त्यामुळे साहजिकच देशांतर्गत कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच सूतगिरण्या मालकांना कापूस खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कापसाचे दर तेजीतच आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये परदेशातून भारतीय कापसाला मागणी वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे देशांतर्गत बापसा चे बाजार भाव स्थिर राहतील आणि तेजीतच राहतीलअसा कापुस अभ्यासकांचा अंदाज आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये भारतीय व्यापाऱ्यांनी 14 लाख कापूस गाठींची सौदे विदेशातील खरेदीदार सोबत केलेली आहेत.त्यासोबत इंडोनेशिया ने सुद्धा भारतीय कापूस आयात केलेला आहे.
जर अमेरिकेचा विचार केला तर तेथील प्रमुख बाजार भाव असलेल्या न्यूयॉर्क येथील बाजार भाव 121 सेंट वर पोहोचला आहे. तसेच भारतातील प्रमुख राज्य जसे की कर्नाटक, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा येथील कापसाचे बाजार भाव तेजीतच आहेत.गुजरातमधील राजकोट येथील प्रमुख कापूस केंद्रांमध्येखूप मोठ्या प्रमाणावर बाजार भाव सुधारणा झालेली आहे. त्याचेही कापसाचा बाजार भाव 8 हजार 500 पेक्षा जास्त आहे.
( माहिती स्त्रोत- उत्तम शेती)
Share your comments