कापूस या पिकाची भारतात जवळपास सर्वच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आपण पाहिलेच होते की मागच्या वर्षी कापसाला कधी नव्हे एवढे उच्चांकी दर मिळाले होते. त्यामागे भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये कापूस अतिवृष्टीमुळे खराब झाला होता त्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली होती
व त्यामागे काही आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती देखील कारणीभूत होती. परंतु यावर्षी देखील कापसाची लागवड वाढेल या पद्धतीचा एकंदरीत अंदाज होता व त्या अंदाजानुसार देशात कापसाची लागवड वाढली.
नक्की वाचा:तज्ञ सांगताहेत कपाशीमध्ये डोमकळी दिसताच फक्त करा हा उपाय तरच होईल कमी गुलाबी बोंडअळी
तसेच महाराष्ट्राचा विचार केला तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कपाशीचे पीकखराब झाल्याची स्थिती आहे. जवळपास जर आपण कापूस बाजाराचा विचार केला तर राज्यातील कापूस दिवाळीनंतरच बाजारात यायला सुरुवात होते.
परंतु भारतातील पंजाब व हरियाणा या राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन आले असून तो विक्रीसाठी बाजारात देखील दाखल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे या कापसाचे दर अगदी सुरुवातीपासूनच नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल मिळाले आहेत. या राज्यांमध्ये जो काही कापूस उत्पादित होतो तो नवा कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.
या भावाच्या बाबतीत जाणकारांच्या मताचा विचार केलातर त्यांच्यामते कापसाच्या दरात जागतिक पातळीवर तेजी असल्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील संपूर्ण हंगाम तेजीत राहण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
नक्की वाचा:कुकुंबर मोझॅक व्हायरस (इन्फेक्शियस क्लोरोसिस) ओळख आणि नियोजन
या हंगामात देखील कापूस तेजीत राहण्याची कारणे
जरा आपण एकंदरीत महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये प्रमुख कापूस उत्पादक विभाग असलेले विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी जोरदार पाऊस झाला त्यामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच तेलंगणा, गुजरात सारख्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये देखील जास्त पावसाने कापूस पिकाचे नुकसान केले आहे.
त्यामुळे येणारा कापूस हा कमी येईल अशी शक्यता व्यापाऱ्यांमध्ये असल्याकारणाने आहे तो कापूस मोठ्या प्रमाणात खरेदी करून साठा करून ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पूर्ण हंगामात बाजारात तेजी राहिल अशी शक्यता आहे.
Share your comments