यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची (Cotton Grower) चांगलीच चांदी होत आहे. कापसाला यंदा विक्रमी भाव (Record price) मिळताना दिसतोय, हंगामाच्या सुरुवातीला कापसाला दहा हजार प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत होता. कापसाला एवढा विक्रमी भाव या आधी कधीच मिळालेला नव्हता. हंगामाच्या सुरुवातीला मिळणारा भाव फार काळ टिकू शकला नाही, नंतर कापसाच्या दरात अल्पशी घसरण देखील बघायला मिळाली. कापसाचे दर हे आठ हजार ते नऊ हजार दरम्यान स्थिरावले. मात्र जरी हे रेट पडलेले असले तरी मागच्या अनेक वर्षापासून मिळत असलेल्या बाजारभावापेक्षा हा देखील भाव विक्रमीच होता. म्हणून यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लॉटरी लागली असल्याचे सांगितलं जात आहे. कापसाला एवढा विक्रमी बाजार भाव मिळण्याचे अनेक कारणे आहेत, त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे कापसाच्या क्षेत्रात झालेली लक्षणीय घट (Significant decline in cotton area), तसेच अवकाळी पावसामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसल्यामुळे उत्पादनात झालेली घट यामुळे देखील कापसाचे भाव चांगलेच वधारले (Increased) आहेत.
तसेच शेती क्षेत्रातील जाणकार लोक (Knowledgeable people in the field of agriculture) असे देखील सांगतात की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (In the international market) कापसाचा मोठा तुटवडा (Scarcity) निर्माण झाला आहे, त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कापसाला यंदा चांगलाच विक्रमी बाजारभाव (Market price) प्राप्त झाला आहे. कापसाला सोन्यासारखा भाव मिळत असल्याने अनेक कापूस उत्पादक शेतकरी आता कापूस पिकाचे फरदड घेण्याचा निर्णय करत आहेत, हंगामाच्या सुरवातीला दहा हजार पर्यंत असलेले दर आता जरी डगमगले असले तरी हे रेट मागील अनेक वर्षापासून असलेल्या बाजारभावापेक्षा चांगले असल्याने कापूस उत्पादक शेतकरी कापसाची फरदड घेण्याकडे वळताना दिसत आहेत.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मते कापूस फरदड घेण्यासाठी खर्च हा जवळपास नगण्य असतो. साधारणतः जर कापुस फरदड घ्यायचे नसेल तर कापसाच्या पाच सहा वेचण्या झाल्यानंतर कापसाचे पीक मोडीत काढले जाते, आणि त्याऐवजी दुसऱ्या पिकांची पेरणी केली जाते. मात्र जर कापसाचे फरदड घ्यायचे ठरवले, तर कापसाचे पिक तसेच शेतात (In The Farm) उभे राहू दिले जाते, आणि या पिकाला परत पाणी दिले जाते तसेच खताची एखादी मात्रा दिली जाते. मग उन्हाळ्यात याला कापूस यायला सुरुवात होते. मात्र कापसाचे फरदड उत्पादन हे शेतजमिनी साठी उपयुक्त नसल्याचे कृषी वैज्ञानिक (Agricultural Scientist) सांगत असतात.
कापसाची फरदड घेतल्याने बोंड अळीचा प्रादुर्भाव (Outbreak) हा झपाट्याने वाढतो तसेच येत्या हंगामातील पिकावर देखील या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याशिवाय कापसाचे फरदड उत्पादन हे दर्जेदार (Quality) नसते, त्यामुळे कापसाची फरदड घेऊ नये असे कृषी वैज्ञानिक वारंवार सांगत असतात. मात्र असे असले तरी कापसाला मिळत असलेला उच्चांकी दर यामुळे कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे फरदड उत्पादन घेण्याच्या मोहजाळ्यात (In the illusion) अडकलेले दिसत आहेत.
Share your comments