1. बातम्या

Corona virus : देशभरात ३ मेपर्यंत राहणार लॉकडाऊन - पंतप्रधान मोदींची घोषणा

KJ Staff
KJ Staff


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.  देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “कोरोनाचा (Corona virus) फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेले नाही.  त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून लॉकडाऊन वाढवला जावा, असा सल्ला देण्यात आला आहे.  अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे.  सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.

देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, 'तुम्हा सर्वांच्या त्यागामुळेच भारत आतापर्यंत कोरोनाचा (Corona virus) प्रादूर्भाव रोखण्यात यशस्वी झाला.  त्यामुळेच कोरोनाविरोधात भारताची कोरोनाशी लढाई मजबूत आहे. शिस्तबद्ध रितीने भारतीयांनी कर्तव्याचे पालन केले आहे.  अनेकांना खूप त्रास भोगावा लागला.  एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे.'  बाबासाहेब आंबेडकरांना हीच आदरांजली की प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात.  अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात नववर्षाचे स्वागत देशभऱात झाले, परंतु लोकांनी नियमांचे संयमाने पालन केले.  घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे,” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितले.  काही दिवासांपुर्वीच पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊन आणि राज्यांमधील परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी  संवाद साधला होता. त्य़ावेळी बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याचा विनंती केली होती.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters