देशासह जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून अनेकांचा जीव या विषाणूमुळे गेला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना व्हायरसविषयी एक संशोधन करण्यात आले आहे. ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हे संशोधन केले असून यात धक्कादायक बाब समोर आली आहे. वटवाघुळांमध्येही कोरोना व्हायरस असतो, अशी माहिती ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे रामन गंगाखेडकर यांनी दिली. चीनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार करोना व्हायरस हा वटवाघुळांमध्येही असतो.
हा व्हायरस वटवाघुळांमधून संक्रमित झाला असं म्हटले जाते यावर आयसीएमआर ने संशोधन केले. यात एक धक्कादायक बाब समोर आली. गंगाखेडकर यांच्यामते दोन प्रकारच्या वटवाघुळांमध्ये कोरोना व्हायरस असतो. मात्र त्याचे संक्रमण माणसाकडे होत नाही. तो वटवाघुळांमध्येच संक्रमित होऊ शकतो. वटवाघुळांमधून माणसाकडे कोरोना संक्रमित होणे ही घटना हजार वर्षात एखादी घडू शकते असेही, त्यांनी स्पष्ट केले. ICMR चे रामन गंगाखेडकर यांना वटवाघुळांमुळे करोना पसरतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना हा व्हायरस दोन प्रकारांच्या वटवाघुळांमध्ये आढळतो. मात्र तो वटवाघुळांमधून माणसांमध्ये संक्रमित होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. वटवाघुळातून माणसात करोना संक्रमित होण्याची शक्यता १ हजार वर्षात एखादी घडते असंही त्यांनी म्हटले आहे. चीनमध्ये करोनाचा संसर्ग वटवाघुळाद्वारे होतो का? यावर संशोधन करण्यात आले होते. त्यानंतर भारतातही असे संशोधन करण्यात आले.
Share your comments