पुणे : कोरोनाचे दिवसेंदिवस संकट वाढत असून यात गळीत हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला आहे. पण साखर कारखान्यांनी अद्याप मजुरांशी अद्याप कोणताच करार केलेला नसल्याने ऊसतोड मजुरां समोर रोजगाराचे संकट उभे राहताना दिसत आहे. मजुरांशी करार होण्यास विलंब होत असल्याने महाराष्ट्रातील कारखान्यानी ऊसतोड यंत्राची मदत घ्यायची असे ठरवलेले दिसते.
द हिंदू बिझनेसलाईनच्या वृत्तनासार साखर कारखाने मोठया प्रमाणावर ही यंत्रे खरेदी करत असून त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या उत्पनाचे साधन बुडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांनी जवळजवळ २०० यंत्राची मागणी नोंदवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या हालचालीला मर्यादा आल्या आहेत. तसेच कोणतीही लस किंवा शासकीय आदेश नसल्यामुळे कारखान्यामध्येदेखील संभ्रम आहे. त्यातच यावर्षी उसाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढ झाल्यामुळे कारखान्यांना कमी वेळात अधिक उसाचे गाळप करावे लागणार आहे.
अशा परिस्थितीत जर मजुरांची अडचण निर्माण झाल्यास शेतकरी आणि कारखान्यांना त्याचा भार सोसावा लागणार आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेत ऊसावर रोजीरोटी अवलंबून असणाऱ्या ऊसतोड मजुरांचे मात्र हाल होणार आहे. त्यांना उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे सरकराने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Share your comments