1. बातम्या

कोरोना व्हायरसमुळे वातावरणात सकारात्मक बदल ; स्वच्छ झाली प्रदुषित हवा

कोरोना व्हायरसविरुद्धात पुर्ण जग लढा देत आहे. या आजाराच्या संक्रमण चक्राला तोडण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. आजाराविषयी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. योग्य काळजी घेतल्यास आपण या विषाणूपासून बचाव करु शकतो, असे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी वारंवार सांगतिले आहे.

KJ Staff
KJ Staff


कोरोना व्हायरसविरुद्धात पुर्ण जग लढा देत आहे. या आजाराच्या संक्रमण चक्राला तोडण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. आजाराविषयी लोकांमध्ये भीतीचे वातावरण  आहे. योग्य काळजी घेतल्यास आपण या विषाणूपासून बचाव करु शकतो, असे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी वारंवार सांगतिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आजाराच्या संक्रमणाला तोडण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन पुकारला आहे. लॉकडाऊनमुळे थोडीफार अडचण प्रत्येकांना येत आहे. परंतु या लॉकडाऊनमुळे एक सकरात्मक बदल पाहाण्यास मिळत आहे.  साधारण दोन - तीन दिवस झाले असतील देशात लॉकडाऊन लागून. या दरम्यान आपल्याला कसालाच गोंगाट ऐकू येत नाही ना कोणत्या प्रकारचे ध्वनी प्रदुषण. नेहमी मोठ्याने हॉर्न वाजून गाड्या पळवणाऱ्यापासून आपली सुटका झाल्यासारखे आपल्याला वाटते. आकाशही निखळपणे दिसत दिसत आहे. वाहनांच्या कर्कश आवाजाऐवजी पक्ष्यांचे गोड आवाज ऐकू येत आहे.

कोरोनामुळे उद्योगांवर परिणाम झाला असून अर्थव्यवस्था मंदावली आहे. पण दुसऱ्या बाजुला लॉकडाऊन केल्यामुळे संक्रमणापासून बचाव होत आहे. तर पर्यावरणातील प्रदुषणातील प्रमाण ही कमी होण्यास मदत होत आहे. वाहतुक आणि कारखाने बंद झाल्यामुळे प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले आहे. पण काय हे चित्र नेहमी असेच राहिल का? याचा परिणाम दीर्घकाळासाठी होईल का? या प्रश्न सध्या निर्माण होत आहे.  शास्त्राज्ञांच्या मते अधिक प्रदुषणाच्या भागात हा आजार जलदगती पसरेल. याचे कारण की, या भागात राहणाऱ्या लोकांचे फुफ्फुस प्रदुषणाने कमजोर असतात.  आपल्यावर वेळ आली की मनुष्य प्राणी अवघड निर्णय पण सहजपणे घेऊन त्यावर अंमलबाजवणी करत असतो. परंतु हीच गोष्ट पर्यावरणातील वायू प्रदुषणामुळे होणाऱ्या आजारांविषयी मनुष्य इतकं लक्ष देत नाही. प्रदुषणामुळे प्रत्येक वर्षी १२ लाख लोक आपला जीव गमावत असतात. यामागील कारण म्हणजे आपण वायु प्रदुषणातून होणारे आजारांना व्यवस्थित समजलेले नाही. दरम्यान या आजारामुळे वाहनांची संख्या कमी होऊन वातावरण स्वच्छ झाले आहे.

वातावरणातील हवा झाली स्वच्छ
लॉकडाऊनमुळे मोठ्य़ा शहरातील प्रदुषणात घट झाली आहे. विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने प्रदुषण वरील एक विश्लेषण जारी केले आहे. या म्हटले आहे की, दिल्ली, मुंबई, कोलकात्ता आणि बंगळुरु येथील प्रदुषणातील घट झाली आहे. मुंबई शहरात आधी लॉकडाऊन झाले होते. यामुळे प्रदुषण २.५ ने कमी झाले होते. त्यानंतर जनता कर्फ्युच्या दिवशी ६१ टक्क्यांनी प्रदुषण कमी झाले होते. याच प्रमाणे दिल्लीत २६ टक्के, कोलकत्तामध्ये ६० टक्के आणि बंगळुरू मध्ये १२ टक्क्यांनी प्रदुषण कमी झाले. दिल्लीच्या वातावरणात नायट्रोजन ऑक्साईडची पातळी ४२ टक्के होती. मुंबईत ६८ टक्के तर कोलकात्तामध्ये ४९ आणि बंगळुरूमध्ये ३७ टक्क्यांनी कमी होती. हा बदल वाहने आणि कारखाने बंद असल्याने झाला आहे.

English Summary: corona virus effect on atmosphere reduce pollution Published on: 27 March 2020, 03:51 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters