MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

कोरोना व्हायरस : देशातील मृतांचा आकडा 12 हजारांच्या घरात, मृत्यूदर वाढला

देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 974 नवीन रुग्णांची नोंद झाली.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 974 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 2003 रुग्णांचा मृत्यू झाला. भारतातील मृत्यूदर 2.9% वरून 3.4 झाला आहे. देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus In India) पहिला मृत्यू झाल्यानंतर 100 दिवसांच्या आतच 10 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू 12 मार्चला झाला होता.

इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या एकूण आकडेवारीनुसार भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताच्या आधी अमेरिका, ब्राझील, रशिया यांच्या क्रमांक लागतो. दरम्यान गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2701 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाख 13 हजार 445 झाला आहे. तर, 1409 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर दिल्लीत सर्वात जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली. दिल्लीत 1859 रुग्णांची नोंद झाली. तर 437 जणांचा मृत्यू झाला. देशात पहिल्या 5000 मृत केसेस 80 दिवसांत आल्या, त्यानंतर केवळ 17 दिवसांत 5000 मृत्यू झाले, ज्यामध्ये गेल्या आठवड्यात 2500 हून अधिक लोक मरण पावले. कोरोनामुळे भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश आहे, तर कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत आठव्या क्रमांकावर आहे.

English Summary: corona virus : 12 thousand death case in all over country; death ration increased 17 june Published on: 17 June 2020, 02:50 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters