Corona Update : राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा अडीच हजारांवर; जिल्ह्याची विभागणी झोनमध्ये

14 April 2020 04:11 PM


देशातील कोरोनाचे (corona virus)  संकट कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे.  यामुळेच राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे.   दरम्यान राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आज आणखी भर पडली.  राज्यात नव्याने १२१ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले असून एकूण संख्या २हजार ४५५ इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

त्यापैकी मुंबई ९२, नवी मुंबई १३, रायगड १, ठाणे १० आणि वसई-विरारमध्ये ५ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान दिल्लीतील निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण कोरोना बाधित आढळले आहेत.

केंद्राने कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार राज्याचे तीन झोन तयार करण्याच्या सूचना केल्यानंतर आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून माहिती गोळा केली आहे.  राज्यातील ३६ जिल्ह्यांची रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे.  सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबई, पुणे व औरंगाबादचा रेड झोनमध्ये समावेश हाेणार आहे.  एकही कोरोनाग्रस्त नसलेले ९ जिल्हे ग्रीन झोनमध्ये असतील.  या जिल्ह्यांनी वेळीच जिल्हाबंदी केल्याने अद्याप एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

राज्यातील जिल्हानिहाय आकडेवारी

ठाणे - ६, ठाणे मनपा - ६३ तर ३ जणांचा मृत्यू ,  नवी मुंबई मनपा - ५९ , तीन जणांचा मृत्यू,  कल्याण डोंबवली मनपा -  ५०, २ जणांचा मृत्यू ,   उल्हासनगर मनपा - १, भिवंडी निजामपूर मनपा -  १,  मीरा भाईंदर मनपा ४९ , मृत्यू २ ,  पालघर ४, मृत्यू १,  वसई विरार मनपा - ३१ जण , ३ जणांचा मृत्यू ,  रायगड - ६ ,  पनवेल मनपा - ९ , एकाचा मृत्यू ,  नाशिक मंडळ, नाशिक -३  नाशिक मनपा -१,  मालेगाव मनपा - २९ , मृत्यू दोन ,   अहमदनगर - ११,  अहमदनगर मनपा - १६,  धुळे - २(मृत्यू - १) , जळगाव - १,  जळगाव मनपा - १(मृत्यू - १),  पुणे मंडळ , पुणे - ७,  पुणे मनपा - २७२, मृत्यू ३१ , पिंपरी चिंचवड मनप - २९,   सोलापूर मनपा - १ (मृत्यू -१), सातारा -६ (मृत्यू - २), कोल्हापूर मंडळ - , कोल्हापूर - १, कोल्हापूर मनपा - ५,  सांगली - २६, सिंधुदुर्ग - १, रत्नागिरी - ५, मृत्यू १,  औरंगाबाद मंडळ-, औरंगाबाद - ३, औरंगाबाद मनपा - २०, मृत्यू - १, जालना - १, हिंगोली - १, लातूर मंडळ,  लातूर मनपा - ८,  उस्मानाबाद - ४, बीड - १,  अकोला मंडळ, अकोला मनपा - १२,  अमरावती मनपा - ५ , मृत्यू १, यवतमाळ - ५,  बुलढाणा - १७ (मृत्यू - १, वाशिम - १ ,  नागपूर मंडळ नागपूर - १, नागपूर मनपा - ३८ (मृत्यू -१), गोंदिया - १

Coronavirus two thousand corona case in maharashtra district division state health department कोरोना व्हायरस दोन हजारांच्यावर कोरोनाग्रस्त महाराष्ट्र राज्य राज्य आरोग्य विभाग
English Summary: Corona Update :2 thousand 455 case in Maharashtra , zone division of district

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.