1. बातम्या

आनंदाची बातमी! कोरोनावर उपचारासाठी आता नाकाद्वारे दिले जाणार औषध; भारतातील पहिला नेजल स्प्रे बाजारात दाखल

गेल्या दोन वर्षांपासून भारता समवेतच संपूर्ण जगात कोरोना नामक महाभयंकर आजाराचे सावट पसरलेले आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था विस्कटलेली बघायला मिळत आहे. कोरोना साठी शासन दरबारी अनेक उपाय योजना केल्या गेल्यात, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवून भारताने कोरोनाला अटकाव घालण्यात यश प्राप्त केले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात सर्वत्र वेगाने लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
corona treatment

corona treatment

गेल्या दोन वर्षांपासून भारता समवेतच संपूर्ण जगात कोरोना नामक महाभयंकर आजाराचे सावट पसरलेले आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था विस्कटलेली बघायला मिळत आहे. कोरोना साठी शासन दरबारी अनेक उपाय योजना केल्या गेल्यात, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना  राबवून भारताने कोरोनाला अटकाव घालण्यात यश प्राप्त केले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात सर्वत्र वेगाने लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी आता भारतीय बाजारात नाकाद्वारे दिले जाणारे औषध उपलब्ध झाले आहे. यामुळे कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतातील प्रमुख औषध उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाणारी ग्लेनमार्क नामक कंपनीने देशात प्रथमच नेजल स्प्रे बाजारात उपलब्ध करून दिला आहे. हा नेजल स्प्रे कोरोनाच्या उपचारासाठी कारगर सिद्ध होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कोरोना मुळे प्रौढ व्यक्तींना गंभीर आजारपण येण्याचा धोका असलेल्या प्रौढासाठी हा नेजल स्प्रे तयार करण्यात आला आहे. हा नेजल स्प्रे उपयोगात आणून नाकाद्वारे कोरोनावर उपचार केला जातो. हा स्प्रे मात्र दोन मिनिटात कोरोनाच्या विषाणूला नाकातच नष्ट करण्यास सक्षम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. भारतीय प्रमुख औषध निर्माती कंपनी ग्लेनमार्क आणि कॅनडाची सॅनोटाईज कंपनीने भागीदारी तत्त्वावर या स्प्रेचे निर्माण केले आहे.

या नेजल स्प्रेला फॅबिस्प्रे असे नाव देण्यात आले आहे. भारतातील औषध महा नियंत्रक अर्थात डिसिजीने या स्पर्धेचे उत्पादन आणि वितरण करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या स्प्रेच्या देशात तीन प्रकारच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. हा स्प्रे 24 तासात  94 टक्के कोरोणाचे विषाणू संपविण्यास सक्षम आहे तसेच मात्र 48 तासात 99% कोरोना विषाणूचा हा स्प्रे नायनाट करू शकतो. हा स्प्रे नाकाद्वारे दिला जात असल्याने नाकातच कोरोनाविषाणू विरुद्ध भौतिक आणि रासायनिक क्रिया घडून येतात त्यामुळे कोरोना विषाणूला श्वसन नलिका तसेच फुफ्फुसांपर्यंत जाण्यापासून रोखता येते, हा स्प्रे नाकातच कोरोना विषाणूचा नायनाट करून टाकतो. ग्लेनमार्क कंपनीचे वाणिज्यिक अधिकारी रॉबर्ट यांनी हा स्प्रे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सक्षम आहे असे म्हटले. 

ग्लेनमार्क कंपनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रमुख सहकारी असल्याचे देखील त्यांनी म्हटले. ग्लेनमार्क कंपनीच्या या स्प्रेला भारता समवेतच अनेक देशात उपलब्ध करून दिले जाणार आहे. सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग, नेपाळ, तैवान, ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, श्रीलंका, व्हिएतनाम या आशिया खंडाच्या आणि भारताच्या सहकारी देशात हा स्प्रे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

English Summary: corona treatment is now became very effective because of this spray Published on: 10 February 2022, 12:57 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters