
कोरोनामुळे अनेक उद्योग डबघाईला येत आहेत. यादरम्यान डाळ उद्योगाला मात्र भरभराटीचे दिवस आले आहेत. जागतिक पातळीवर डाळींचा मागणीत वाढ झाल्याने जळगावहून निर्यात होत असलेल्या डाळ उद्योगात ३० टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे डाळ उद्योजकात सामाधनाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. मांसाहार केल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होते, अशी भीती पसरल्याने जागतिक पातळीवर अनेकांनी मांसाहार कमी केला आहे. अनेकांनी शाकाहार घेणे पंसत केले आहे. डाळींमध्ये पोषक घटक आणि सुरक्षित आहार म्हणून भारतीय डाळींकडे पाहिले जात असल्याने त्याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर डाळींच्या मागणीत वाढ झाली आहे.
जालाना कृषी उत्तन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मृग बहाराची मोसंबी विक्रीसाठी आली आहे. परंतु बाजारात मात्र मोसंबीचे दर घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाने मोसंबीचा भाव कमीत कमी 600 ते जास्तीत जास्त 1200 रुपये क्विंटलवर आला आहे. सध्याच्या काळात या बहाराला मार्केटमध्ये मोठी मागणी असते. मात्र कोरोनामुळे ही मोसंबीचे दर गडगडले आहेत. मोठे कष्ट करुन पिकवलेल्या मोसंबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जालन्याच्या मोसंबीला दिल्ली, जयपूर, हरियाणासह उत्तरेकडील अनेक राज्यात मोठी मागणी असते.
मात्र कोरोनाचा प्रभावाने स्थानिक मार्केटमध्ये उत्साह नसल्याने तेथील मोठ्या व्यापाऱ्यांनी जालन्याच्या मोसंबीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी स्थानिक बाजार पेठेच्या भरवशावर येथील खरेदीदारांची संख्या रोडावली आहे. जालना बाजार समितीमध्ये अडीचशे ते तीनशे क्विंटल मोसंबीची आवक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी एबीपी माझा या वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार अशा स्थितीला कोरोनाचा प्रभाव कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळणे अशक्य असले तरी भविष्यात भाव वाढण्याची आशा आहे. चार महिन्यांपुर्वी मोसंबीच्या आंबिया बहराला ४५०० रुपये क्किंटल एवढा उच्च भाव मिळाला होता.
Share your comments