कोरोनामुळे गुळ उद्योग बंद होण्याच्या परिस्थितीत

18 March 2021 11:00 AM By: भरत भास्कर जाधव
गुळ उद्योग संकटात

गुळ उद्योग संकटात

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत चालल्याने रोज नियमात बदल होत आहे. मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सतत लॉकडाऊनला सामोरे जावे लागत आहे.याचा परिणाम सर्व उद्योग व्यवसायांवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही उद्योग बंद झाली तर काही बंद होण्याच्या परिस्थितीत आहेत. अशाच एक डबघाईत गेलेल्या उद्योग म्हणजे गूळ उद्योग. या उद्योगाला लॉकडाउनच्या काळात मोठा फटका बसला आहे.

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे बाजारात गुळाचा भाव खूपच पडला आहे. यामुळे चिंता वाढली आहे, येणाऱ्या काळात आणखीन लॉकडाऊन लागल्यास गुळ उद्योग संपुष्टात येईल अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गूळ उद्योगासाठी प्रशासनाने आर्थिक तरतूद करावी अन्यथा हा उद्योग डबघाईत जाईल.

 

बीड जिल्ह्यात ५० हून अधिक गूळ उद्योग सुरु आहेत . या उद्योगाचा जिल्यातील अतिरिक्त ऊस उत्पादनाला मोठा फायदा होतो. मात्र मागील काही दिवसांपासून लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे गुळाचे भाव खूप पडले आहेत. ऊस खरेदी करत प्रक्रिया करून गुळाला कवडीमोल भाव मिळत असल्याने नफा तर दूरच केलेला खर्चही मिळत नसल्याचे सांगितल्या जात आहे.

 

Jaggery industry corona effect गुळ उद्योग
English Summary: corona effect on jaggery industry

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.