देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत २ लाख जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. परंतु यादरम्यान एक दिलासादायक गोष्ट घडत असून लोकांचा दुष्टीकोन बदलणारे चित्र सध्या तयार होत आहे. लोकांचा आता जैविक सेंद्रिय शेतीकडे कल वाढताना दिसत आहे. याविषयी माहिती नीती आयोगचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. नागरीक आता खाण्यासाठी रासायनिक औषध नसलेले पदार्थ किंवा आहाराचा शोध घेत आहेत. ज्यामुळे माणसाच्या शररिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होईल. जगात पौष्टीक आणि रासायनिक औषध नसलेल्या अन्न पदार्थांची मागणी वाढली आहे. अशात फक्त इकोलॉजी या जगाला वाचवू शकते.
एग्रो इकोलॉजी सेंद्रिय शेतीविषयी अभ्यास करण्याची एक प्रक्रिया आहे. यातून रासायनिक औषधे किंवा खते न वापरता पिकांचे उत्पादन कसे वाढवले जाते. प्राकृतिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची पिके, भाजीपाला, फळे कशा प्रकारे पिकवले जातात. दरम्यान या राऊंड टेबल कार्यक्रमात १२ देशातील विशेषज्ञ सहभागी झाले होते. यावेळी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटेन, नेदरलँड आणि संयुक्त राष्ट्रासह १२ देशांमध्ये विशेषज्ञांनी भाग घेतला होता. सेंद्रिय शेती भारताकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांचे कौतुक या विशेषज्ञांनी यावेळी केल्याचे कुमार यांनी सांगितले.
यात हवामानाला वातावरणाचे नुकसान न करता शेती कशाप्रकारे केली जाईल यावर चर्चा या बैठकीत करण्यात आली. जेणेकरून पिकांची वाढही अधिक होईल, वातावरण, हवामानावरही कोणता परिणाम होणार नाही. मातीच्या गुणवत्तेतही सुधारणा होईल. यात सर्वात महत्त्वाचे आहे की, आर्गेनिक कार्बन आणि जिवाणूंचां स्तर मातीत वाढवला जावा.
भारताच्या अनेक राज्यात सेंद्रिय शेती होत आहे. राजीव कुमार यांनी सांगितले की, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेशात सेंद्रिय शेती अधिक केली जाते. यात भुपृष्ठ पातळीवर फायदे झाल्याचे दिसले आहेत. आता वेळ आली असून देशाच्या इतर राज्यातही सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन दिले पाहिेजे. सध्या ३० लाख शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. ही शेती आता १६ कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवयाचे आहे. या शेतीचा अजून एक फायदा हा आहे की, पाण्याची कमी उपलब्धता असली तरी शेती करता येते. आपण आपल्या शेतीसाठी जितके पाणी देत असतो त्याहून कमी १० टक्के कमी पाण्यात सेंद्रिय शेती केली जाते.
Share your comments