देशातील लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान वाढत्या लॉकडाऊनसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलेला दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. परंतु देशासह राज्यात कोरोनाचा कहर वाढत असून राज्यात आज तब्बल १ हजार ८ रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११ हजार ५०६ वर पोहचला आहे. राज्यातील बळींचा एकूण आकडा हा ४८६ झाला आहे.
गुरुवारी १८० जण कोरोनामुक्त झाले आहेत तर राज्यातून आजपर्यंत १७७३ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. औरंगाबादमध्ये आज नव्या ३२ रुग्णांची नोंद झाली आहे. यवतमाळमध्ये २ रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात कोरोनाचा हाहाःकार सुरूच आहे. जिल्ह्यात काल ११५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८१५ झाली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात काल २४ तासात ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्यनेने शंभरी गाढली आहे. औरंगाबादमध्ये सकाळी आणखी २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यासोबत शहरातली कोरोनाबाधितांचा आकडा २३६ वर पोहोचला आहे.
जालन्यात कोरोनाचे ५ रुग्ण आढळले. यामध्ये ४ एसआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. हे जवान मालेगावहून परतले होते. तर आतापर्यंत दोन रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान जगभरातील २१२ देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ३९ हजार पार पोहोचली आहे. मागील २४ तासात ९४ हजार ५५२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर जगभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ५ हजार ६२४ ने वाढला आहे.
Share your comments