मका हे पिक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मका हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण पीक असून मका पिकाच्या लागवडीतून चांगले आर्थिक उत्पन्न शेतकरी बांधवांना मिळते. जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर मक्याला चांगल्यापैकी बाजारभाव मिळाले होते व मागच्या हंगामामध्ये मक्याचे विक्रमी उत्पादन झाले होते.
जर आपण मागच्या वर्षाच्या दोन्ही हंगामातील एकूण उत्पादनाचा विचार केला तर ते 336 लाख टन इतके झाले होते. मागच्या वर्षी मक्याच्या उत्पादनात वाढ झाली होती.
परंतु यावर्षी केंद्र सरकारने या खरीप हंगामामध्ये 231 लाख टन मका उत्पादन होईल अशा पद्धतीचा अंदाज जाहीर केला होता. जर आपण मागच्या वर्षाचा विचार केला तर यावर्षी तब्बल मका उत्पादन पाच लाख टनाने वाढणार असल्याचा अंदाज केंद्र सरकारने जाहीर केला.
परंतु यावर्षी जर आपण मका पिकाचा विचार केला तर या वर्षी झालेल्या जास्तीच्या पावसाने इतर पिकासोबत मका पिकाला देखील प्रमाणात फटका बसला. त्यामुळे मक्याचे एकूण उत्पादन कमी राहील असे जाणकार सांगत आहेत. आता नवीन मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर बाजारात सुरू असून दर मात्र घसरलेले आहेत.
काय आहे सध्या मका उत्पादनाची स्थिती?
जर आपण सध्याच्या मका उत्पादनाचा विचार केला तर यावर्षी जुलै ते सप्टेंबर आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जो काही पाऊस झाला त्याने मका पिकाचे खूप नुकसान केले.
ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर मका उत्पादक भागामध्ये जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तसेच सतत ढगाळ वातावरण राहिल्यामुळे किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर झाला त्यामुळे केंद्र सरकार पुढील अंदाज उत्पादन कमी करू शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
सध्याचे बाजार समितीमधील मका दराची स्थिती
आपण सद्यस्थितीत राज्यातील बाजार समिती यांचा विचार केला तर मका मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असून पिकाच्या काढणीच्या वेळेस पाऊस आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मका ओला झाला. त्यामुळे ओलावा जास्त असल्याने मक्याला सध्या हमीभावापेक्षा देखील कमी भाव मिळत आहे.
जर आपण नवीन मक्याच्या बाजार भावाचा विचार केला तर तो प्रतिक्विंटल 1600 ते 1900 इतका मिळत आहे. तर जुन्या मक्याला 1900 ते 2300 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत आहे. येणाऱ्या काही काळामध्ये मक्याच्या आवकेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु पुढील काळामध्ये सरासरी 2000 ते 2200 रुपये बाजार भाव मिळण्याची शक्यता देखील केली आहे.
नक्की वाचा:आंदोलनाला यश! पहिली उचल 3100, कारखान्याचे धुराडे सुरू..
Share your comments