जर तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये मका पिकाचा विचार केला तर गहू आणि भात पिकानंतर जगामध्ये तिसरा क्रमांक मक्याचा लागतो.
सर्व तृणधान्य पिकांमध्ये संश्लेषण क्रिया असलेल्या मक्का हे पीक निरनिराळ्या हवामानाची लवकर समरस होऊन त्यामध्ये जास्त उत्पादन क्षमता आढळते. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, लॅक्टिक आणि ऍसिटिक ऍसिड, ग्लुकोज, प्लास्टिक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेक्झिन तसेच बूट पॉलिश इत्यादी विविध पदार्थ तयार करण्याकरता होतो. तसे मका हे पीक उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी जुळवून घेणारे पीक आहे. परंतू पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये धुके पडल्यास ते पिकासाठी नुकसान दायक ठरते. 25 ते 30 अंश सेंटिग्रेड तापमान मका पिकाच्या वाढीसाठी चांगली असते. असे हे महत्त्वाचे पीक सध्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरत असून येणारा काळ हा मका पिकासाठी सोनेरी काळ असेल यात शंका नाही. या लेखामध्ये आपण थोडी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची माहिती घेऊ.
मक्याची एकंदरीत जागतिक परिस्थिती
रशिया आणि युक्रेन या दोन देशांत दरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय मक्याला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर भारतीय मका अमेरिकेच्या मका पेक्षा स्वस्त असल्याने सध्या भारतीय मक्याला चांगला काळ आहे.
बाजारपेठीय अभ्यासकांच्या मते येणारा सहा महिन्याचा कालावधीत 24 लाख टन मका निर्यात होऊ शकते. जर सद्य परिस्थितीचा विचार केला तर ऑक्टोबरपर्यंत 110 ते 120 लाख टन मक्याची देशांतर्गत गरज असल्यामुळे रब्बी त 100 लाख टन मक्याचे उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. तरीसुद्धा ऑक्टोबर आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत मक्याची टंचाई भासू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर तीनही हंगामाचा विचार केला तर खरिपामध्ये दोनशे पाच लाख, रब्बी मध्ये 100 लाख तर उन्हाळी मध्ये 32 लाख टन असे एकूण तीन लाख 37 हजार टन मक्याचे उत्पादन अंदाजे अपेक्षित आहे. एवढ्या उत्पादनातून तर 55 टक्के मक्याच्या आवश्यकता एकट्या पोल्ट्री उद्योगाला आहे.
बांगलादेश आणि नेपाळ नंतर व्हीयतनाममध्ये झाली मोठी निर्यात
जर भारताच्या मकानिर्यातीचा विचार केला तर ते प्रामुख्याने बांगलादेश आणि नेपाळ मध्ये मोठ्या प्रमाणात होते. परंतु पहिल्यांदाच व्हिएतनाम मध्ये मक्याचे निर्यात फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच मलेशिया, म्यानमार, भूतान,तैवान इत्यादी देश भारतीय मक्याचे ग्राहक आहेत.
मागच्या वर्षी सर्वसाधारणपणे चौदाशे ते पंधराशे रुपये क्विंटल भावाने मका विकला गेला होता. परंतु यावर्षी दोन हजार शंभर ते दोन हजार 400 रुपये क्विंटल भावाने कुक्कुटपालन उद्योगाला मका खरेदी करावा लागत आहे. युक्रेन हा देश आशियाई देशांमध्ये ग्राहक असून जगातील निर्यातीचा 17 टक्क्यांपर्यंत वाटा या देशाचा आहे. युद्धजन्य परिस्थिती मुळे या देशातील बंदरे उध्वस्त झालेली असल्यामुळे नवीन मका लागवडीसाठी एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय मक्याची मागणी वाढून आशियाई देशांमध्ये निर्यातीचा आलेख उंचावत राहिल अशी शक्यता आहे. परत भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर हंगामाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दहा महिन्यात मक्याच्या निर्यातीत 28 टक्क्यांची वाढ होऊन ऑक्टोबर ते मार्चमध्ये 22 लाख टन मका निर्यात झाला.
मागच्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीत सहा पटीने वाढ झाल्याचे बाजारपेठेत तज्ञांचे म्हणणे आहे. मका लागवड क्षेत्राच्या बाबतीत जगात चौथा तर उत्पादनाबाबत सातव्या क्रमांकावर आहे. जागतिक एकूण क्षेत्राच्या चार टक्के क्षेत्रावर मक्याचे लागवड भारतात होते तर उत्पादन दोन टक्के भारतात होते.
महत्वाच्या बातम्या
Share your comments