कोरोना महामारी च्या काळात सगळे उद्योग व्यवसाय ठप्प होते परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम शेती क्षेत्राने केले.
. गेल्या सात वर्षापासून केंद्र सरकारने विविध माध्यमातून शेती क्षेत्राला तंत्रज्ञान पुरवल्यामुळे कृषी व कृषिपूरक क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान हे तब्बल 26.9 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत दिली.. गेल्या सात वर्षापासून केंद्र सरकारने विविध माध्यमातून शेती क्षेत्राला तंत्रज्ञान पुरवल्यामुळे कृषी व कृषिपूरक क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान हे तब्बल 26.9 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत दिली.
याबाबतचा तपशील देताना ते म्हणाले की,2013-14 या वर्षात कृषी क्षेत्राचे योगदान 16 लाख 9 हजार 198 कोटी रुपये होते ते वाढून 2020 ते 21 मध्ये तब्बल 20 लाख 40 हजार 79 कोटी रुपयांवर पोचली आहे. तसेच निर्यातीच्या बाबतीतली आकडेवारीही 2013-14 मध्ये कृषी क्षेत्रातील निर्यातीचे मूल्य हे दोन लाख 62 हजार 778 कोटी रुपये होते. ते वाढून 2020 ते 21 मध्ये तीन लाख दहा हजार 228 कोटी रुपये झाले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती व तंत्रज्ञान पुरविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकता यावे यासाठी सरकारने देशात जवळजवळ 725 कृषी विज्ञान केंद्रांची स्थापना केली आहे. स्थान विशिष्टता ओळखण्यासाठी शेती चाचणी करणे, सुधारित कृषी तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढविणे यासाठी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. तसेच वायू प्रदूषण कमी व्हावे यासाठी पिकांच्या अवशेषांचा निचरा करण्यासाठी असलेल्या यंत्राला अनुदान दिले जात आहे तसेच पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना यासाठी केंद्र सरकारने शंभर टक्के अनुदान सुरू केले आहे.
Share your comments