कालपरवाच बैलगाडी शर्यती बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला, त्यामुळे आता बैलगाडा मालकांच्या आनंदाला काही सीमाचं राहिलेली नाही. आता शर्यतीसाठी जोमाने तयारी देखील राज्यात सुरू आहे, आणि अशातच एक बातमी समोर येत आहे. त्याचे झाले असे की, बारामती तालुक्यात शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून एका माथेफिरूने तो चक्क चोरूनच आणला. खरे पाहता ही घटना बैलगाडा शर्यती संबंधी निर्णयाच्या आधीची आहे, पण या गोष्टीला उधाण हे आत्ता येताना दिसत आहे.
बैलगाडा शर्यती ला माननीय सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली त्यामुळे राज्यात सध्या खिलार जोड्यांना जास्त मागणी दिसत आहे. असेच बारामती तालुक्यात एका माथेफिरूने एका खिलारी जोडीच्या मालकाला खिलारी बैलाची मागणी घातली, पण बैल मालकाने बैल विक्री करण्यास नकार दर्शवला.
नेमक काय घडले होते
रमेश रामा करगळ हे ऊसतोडणी मजूर आहेत ते मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रहिवासी आहेत. रमेश हे कामासाठी आपला जिल्हा सोडून बारामतीला आले, रमेश हे कामाला आपल्या परिवारासोबत बारामतीला आले आहेत, रमेश यांच्याकडे एक खिलारी खोंड देखील आहे त्याला सुद्धा रमेश यांनी सोबत आणले आहे. सध्या बारामती मधील मानजीनगर येथे रमेश काम करत होते. या ठिकाणी त्यांना अनोळखी व्यक्तींनी बैलाबद्दल विचारणा केली व तो विकणार का असे देखील विचारले.
पण त्यांनी त्यांच्या खिलारी बैलाला लहानपणापासून सांभाळले होते म्हणून त्यांना तो खोंड विकायचा नव्हता म्हणुन त्यांनी स्पष्ट त्या अनोळखी व्यक्तींना नकार दिला. आणि दुसऱ्याच दिवशी रमेश यांचा खोंड गायब झाला, त्यांनी सर्वांकडे शोधाशोध केली, मात्र त्यांचा खोंड त्यांना गावला नाही, तसेच ते आपला जिल्हा सोडून आले होते म्हणुन पोलीस तक्रार करायला घाबरत होते, पण त्यांना एका स्थानिक माणसाने मदत केली आणि पोलिसांत तक्रार केली, तसेच त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी त्यानुसार त्या तपास करणाऱ्या व्यक्तीचा मागोवा घेतला आणि शेवटी त्यांनी तीन लोकांना अटक केली हे तिघे खेड तालुक्यातील असल्याचे समजले.
Share your comments