सध्या भारतीय रुपया सर्वात वाईट परिस्थितीतून जात असून जर आपण बुधवारचा विचार केला तर डॉलरच्या तुलनेत रुपयाने नीचांकी पातळी गाठली होती आणि हीच परिस्थिती येणाऱ्या काळात देखील कायम राहण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामागे जागतिक मंदी हे कारण तर आहेच परंतु अनेक कारणांमुळे रुपया याआधीच 6.5% पेक्षा जास्त पटीने घसरला आहे. या परिस्थितीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्यावर काय परिणाम होतो? हे आपण समजून घेऊ.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणीचे आपल्यावर होणारे परिणाम
1- महागाई वाढू शकते- डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे देशात महागाई वाढणार कारण भारत 70 टक्क्यांहून अधिक पेट्रोलियम उत्पादने आयात करतो व आयातिचा व्यवहार डॉलरमध्ये होतो. सहाजिकच रुपया कमजोर झाल्यामुळे भारताला आयातीसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
त्यामुळे सहाजिकच पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीचा खर्च वाढणार असून त्यामुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवू शकतात. याच चक्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर दर वाढले तर वाहतुकीचे शुल्क देखील वाढेल याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेवर होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:हातातोंडाला आलेल्या सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांचा सरकारवर आरोप
2- खाद्य तेल व कडधान्याचे भाव वाढतील- जसे भारत पेट्रोलियम पदार्थ आयात करतो त्यासोबतच खाद्यतेल आणि कडधान्ये मोठ्या प्रमाणावर आयात करतो.
त्यामुळे साहजिकच या दोन्ही पदार्थांच्या आयातीचा खर्च वाढेल व त्याचा परिणाम थेट खाद्यतेल व डाळींच्या किमतींवर दिसण्याची शक्यता असून त्यांचे दरवाढ होऊ शकते. यासोबतच बाहेर देशातून ज्या काही उत्पादने आयात होतात त्या सगळ्या गोष्टींवर परिणाम दिसून येईल.
2- परदेशी प्रवास आणि शिक्षण होणार महाग- डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे तुम्हाला परदेशातील प्रवासाला देखील जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे तसेच परदेशातील अभ्यास करणे देखील महाग होईल.
म्हणजे तुम्ही जेव्हा परदेशी प्रवास कराल किंवा अभ्यासासाठी त्या ठिकाणी खर्च कराल तेव्हा तुम्हाला तेथील स्थानिक चलनासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील व एवढेच नाही तर तुम्ही अशा ठिकाणाहून एखादी सुविधा घेतली किंवा वस्तू घेतली त्यासाठी देखील तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.
Share your comments