1. बातम्या

Swabhimani Sanghatana: साखर वाहतूक करत असलेले कंटेनर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवले, कारण...

कर्नाटक बेडकीहाळ येथे असलेल्या व्यंकटेश्वरा साखर कारखान्यातील साखर वाहतूक करत असलेले वीस कंटेनर हेरवाड येथे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आडून धरले होते.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Sugar Issue

Sugar Issue

कर्नाटक बेडकीहाळ येथे असलेल्या व्यंकटेश्वरा साखर कारखान्यातील साखर वाहतूक करत असलेले वीस कंटेनर हेरवाड येथे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आडून धरले होते. गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारासही हे कंटेनर अडवून कंटेनरच्या चाव्या काढून घेत, साखरेची काही पोती रस्त्यावरच फेकून देण्यात आली होती.

 

परिसरातील शेकडो स्वाभिमानी कार्यकर्ते जमा झाल्याकारणाने तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वाभिमानी संघटनेचे यूवा आघाडी नेते बंडू पाटील यांच्या नेत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.

कुरुंदवाड पोलिसांचे सहाय्यक हे आंदोलन स्थळी दाखल झाले, मात्र जबाबदार अधिकारी आणि खरेदी करणारे व्यापारी आल्याशिवाय कंटेनर सोडणार नाही अशी भूमिका त्यावेळी स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी घेतली होती.

English Summary: Containers transporting sugar were intercepted by Swabhimani activists Published on: 20 October 2023, 02:17 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters