
Organic farming
विषमुक्त भाजीपाला खाणे टाळावे म्हणून जास्तीत जास्त ग्राहक सेंद्रिय शेतीमध्ये जो भाजीपाला पिकवला जात आहे त्याकडे धाव घेत आहे. विषमुक्त भाजीपालाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांनी सेंद्रिय शेती करणे चालू केला आहे तसेच पश्चिम विदर्भ मधील तीन जिल्ह्यात विषमुक्त म्हणजेच सेंद्रिय शेती करण्यास चालू केले आहे. विदर्भ मधील तीनजिल्ह्यामध्ये १० हजार १०० बागा सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करत आहे.
आजकाल शेतकरी कमी जागेमध्ये तसेच कमी वेळेमध्ये शेतीमधून उत्पादन घेण्यासाठी पिकांवर वेगवेगळ्या औषधांचा वापर करत आहेत. या केमिकल्स च्या वापरामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे अनेक ग्राहक सेंद्रिय भाजीपाला कडे ओळत आहेत. महिला बचत गटांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरू केले आहे कारण अनेक ग्राहकांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला पाहिजे परंतु बाजारामध्ये असलेली वेगवेगळी रसायने वापरून शेतकरी भाजीपाला पिकवत आहेत. तीन जिल्हे जसे की अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यामधील १० हजार १०० बागांमध्ये सेंद्रिय भाजीपाला पिकवत आहेत, हा भाजीपाला जून ते जुलै या कालावधीमध्ये लागवड केली आहे.
हेही वाचा:शेतकऱ्यांना आता घरबसल्या नोंदवता येईल पीक नुकसानीची माहिती
वर्षभर खा विषमुक्त भाजीपाला:
आपले कुटुंबाने बारा महिने ताजा टवटवीत तसेच विषमुक्त भाजीपाला खावावा जे की रोजच्या आहारामध्ये सर्व भाज्यांचा समावेश व्हावा म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियानाने माझे पोषण परसबाग ही मोहीम आमलात आणलेली आहे. ग्रामीण भागात परसबाग सुरू केले असून याचा फायदा कुटुंबातील महिलांना होणार आहे कारण कुटुंबातील महिला हा विषमुक्त भाजीपाला घेतील आणि आपल्या कुटुंबाला १२ ही महिने आरोग्यदायक भाजीपाला आहारामध्ये ठेवतील
राज्यभर राबविली ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम :
कुटुंबाचा आरोग्य तसेच पोषणाचा दर्जा सुधारावा म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत माझे पोषण परसबाग विकसन ही मोहीम राज्यात चालू केलेली आहे. या परसबाग १५ जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये सुरू केल्या आहेत जे की या अभियानाला पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे.
Share your comments