इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) ने म्हटले आहे की DAP आणि NPK खतांच्या किंमती वाढवण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. इफकोचे व्यवस्थापकीय संचालक यूएन अवस्थी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की जरी फॉस ऍसिड आणि इतर कच्च्या मालाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड वाढली आहे, तरीही ते खतांच्या किमतीत वाढ करणार नाहीत.ते म्हणाले की, रब्बी हंगामात डीएपी आणि एनपीके खतांची एमआरपी वाढवण्याची कोणतीही योजना नाही कारण त्यांचा उद्देश शेतकऱ्यासाठी लागवडीचा खर्च कमी करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे चार पैसे वाचणार आहेत. याबाबत अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. अखेर आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
IFFCO ही एक आघाडीची सहकारी संस्था आहे जी खतांच्या निर्मिती आणि व्यापारात गुंतलेली आहे. भारतात युरियाचे ५ प्लांट आहेत. असे असले तरी अनेकदा याचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे अनेक ठिकाणी काळ्या बाजारात मोठ्या किमती लावून ते विकले जाते. शेतीमध्ये डीएपीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. डीएपी म्हणजेच डायमोनियम फॉस्फेट हे दाणेदार खत आहे. हे अमोनियावर आधारित खत आहे. या खतामध्ये अर्ध्याहून अधिक फॉस्फरस असतो जो पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही.
या खताचा मुख्य वापर झाडांच्या मुळांच्या विकासासाठी होतो. कारण फॉस्फरस वनस्पतींच्या मुळांना मजबूत करते. डीएपीमध्ये 18 टक्के नायट्रोजन, 46 टक्के फॉस्फरस असते. 18% नायट्रोजन पैकी 15.5% अमोनियम नायट्रेट आणि 46% फॉस्फरस पैकी 39.5 phas आहे. NPK खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तिन्ही आवश्यक पोषक घटक आहेत. हे दाणेदार खत आहे. याचा उपयोग झाडाच्या वाढीसाठी आणि ताकदीसाठी केला जातो. IFFCO APK च्या 50 किलोच्या बॅगची किंमत 1175 रुपये आहे.
NPK खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तिन्ही आवश्यक पोषक घटक आहेत. हे दाणेदार खत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून याच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांनी नाराज व्यक्त केली होती. यामुळे अनेक मंत्र्यांनी याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. राज्याचे कृषिमंत्री यांनी देखील केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.
Share your comments