पुणे, या महिन्यात दूध उत्पादकांना अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे या महिन्यात तब्बल दोनवेळा दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. गेल्या वर्षभरापासून गाईच्या खाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे दुधाचा व्यवसाय करणे जिकरीचे झाले होते. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यामुळे आता कधी नव्हे ते महिन्याभरात (Milk Rate) दुधाच्या दरात सलग दोनवेळा वाढ झाली.
यामुळे आता दूध संघाने घेतलेला निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. यामध्ये खरेदीचा दर हा तीन रुपयांनी वाढणार आहे तर त्याची विक्री ही दोन रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे (Consumer) ग्राहकांना मात्र आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सहकारी आणि खासगी अशा 45 दुग्ध प्रकल्पांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी याबाबत मागणी करत होते.
असे असताना आता याची अंमलबजावणी ही त्वरीत केली जाणार आहे. याच महिन्यातच दुधाच्या दरात वाढ झाली होती, यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना हा दिलासा मानला जात आहे. काही दिवसांपासून दुधाच्या मागणीही वाढत आहे. यामुळे ही दरवाढ झाली. दूध पावडर आणि लोणी याचे दर वाढले आहेत. तसेच इंधनाचे आणि पशूखाद्याचे वाढलेले दर याचाही परिणाम या दरवाढीवर झाला आहे.
आता ग्राहकांना गायीचे दूध हे 48 रुपये लिटर प्रमाणे घ्यावे लागत होते ते 50 रुपयांनी घ्यावे लागणार तर दूध उत्पादकांचे 30 रुपये लिटरचे दूध संघाकडून 33 रुपये लिटर प्रमाणे घेतले जाणार आहे. यामुळे हे नवीन दर लगेच लागू होणार आहेत. यासाठी महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक यांची बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होत आहे त्या प्रक्रिया व्यावसायिकांवर कारवाई देखील केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर याची त्वरीत अंमलबजावणी केली जाणार असल्याचाही निर्णय बैठकी दरम्यान घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे चार पैसे मिळणार आहेत. हा निर्णय सरसकट असणार आहे. दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या दरात वाढ झाल्याने आता याचा फायदा उत्पादकांनाही होणार आहे.
Share your comments