केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी म्हटले की किसान क्रेडिट कार्ड ची सुरुवात अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार च्या काळात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत कृषी क्षेत्रासाठी सहा लाख करोड पर्यंत कर्जमर्यादा होती, ती आता वाढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 लाख करोड रुपये केली आहे.
पुढे नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, मी बँकांना धन्यवाद देईल कारण कोणाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी चालवलेल्या अभियानाला बँकांनी महत्त्व देऊन एक करोड पेक्षा नवीन शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्याचे काम केले. तसेच त्यांनी म्हटले की, सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रातील सगळ्या प्रकारच्या कमतरता भरून काढल्या जातील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल. कोरोना महामारी च्या काळात शेती आणि शेती संबंधित उद्योग प्रभावीत झाली नाहीत.
पुढे नरेंद्र सितंबर म्हणाले की, शेती क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून एम एस पीला परिभाषित करण्यासाठी बऱ्याच गोष्टी सरकारच्या मनात आहेत. त्यासाठीच या काही सुधारणा झाल्या आहेत आणि काही सुधारणा या येणाऱ्या काळात केल्या जातील. त्यांनी म्हटले की, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला विश्वास आहे की किसान संघ आमच्या विनंती वर चर्चा करेल. हे सरकारच्या प्रस्तावावर जे जोडू इच्छिता किंवा हटवू इच्छिता ते त्यांनी सरकारला सांगितले पाहिजे. तसेच त्यांच्या वेळेनुसार आणि तारखेनुसार आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की 25 डिसेंबर अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवश भारत सरकार सुशासन दिवस म्हणून पूर्ण देशात साजरा करतो. या दिवसाच्या मुहुर्त साधून एम किसान सन्मान निधी चे अंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरा हजार करोड रुपये ट्रान्सफर केले जाते.
Share your comments