नुकताच कर्नाटकमध्ये विधानसभेचा निकाल लागला. यामध्ये काँग्रेसला स्पष्ठ बहुमत मिळाले आहे. कर्नाटकचा विधानसभेचा निकाल ठरल्यानंतर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती.
यामध्ये डीके शिवकुमार की सिद्धरामैया ही दोन नावे आघाडीवर होती. अखेर आता या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. लवकरच त्यांचा शपथविधी होणार आहे.
तसेच डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच डीके शिवकुमार यांना महत्त्वाच्या मंत्रालयांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे.
KJ Chaupal मध्ये भारत आणि ब्राझीलमधील सहकार्य आणि सांस्कृतिक संबंधावर चर्चा
उद्या बंगळुरूमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यामध्ये अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांचीही भेट घेतली आहे. आता राहुल डीके शिवकुमार यांची भेट घेणार आहेत.
यंदा दुष्काळ पडणार? हवामान खात्याने दिला इशारा..
यामुळे आता कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला आहे. लवकरच मंत्रिमंडळ देखील होणार आहे. यामुळे मंत्रिपद मिळण्यासाठी आमदार आग्रही आहेत.
ऊस बिलासाठी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला, हर्षवर्धन पाटलांच करायचं काय, खाली मुंड वर पाय, शेतकऱ्यांच्या घोषणा
तेलंगणामध्ये सरकार करणार हमीभावाने ज्वारीची खरेदी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
शेतकऱ्याने आंब्याला दिले शरद पवारांच नाव! कारणही सांगितलं...
Share your comments