या पार्श्वभूमीवर फाऊंडेशनने सर्व महाराष्ट्रभरात आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच वर्धापनदिना निम्मित तब्बल 26 जिल्हात सामाजिक उपक्रम पार पाडले व कृषी विषयक काही कार्यक्रम घेतले. यात वाशीम , गडचिरोली, औरंगाबाद, मुंबई, पुणे , नाशिक,सांगली अश्या जिह्यात महारक्तदान शिबिरे, अन्नदान , शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन, सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य वाटप , आरोग्य शिबिरे तसेच महाराष्ट्रात कोरोनाने पाऊल मोठ्या दणक्यात पाऊल टाकले असताना , त्याला दोन वर्षे होत असताना परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यावरील उपायही मुलभूत स्वरूपाचे हवेत. यासाठी सरकार आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे संकटाला सामोरे जात आहेत.
काही डॉक्टर दवाखान्यांमध्ये उत्तम सेवा देत कोरोना रुग्णांना बरेही करत आहेत. त्यातच काही डॉक्टर या युवा पर्व फाउंडेशन च्या माध्यमातून रुग्णांना फोनवर व व्हिडिओ च्या माध्यमातून लोकांना आरोग्यविषयक सल्ले देत आहेत. व युवा पर्व फाउंडेशन नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्पर असते त्याच प्रमाणे महाराष्ट्र सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी सुरु केलं आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी (माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिकपेरा) हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत असून पाहणी मोबाईल अँप द्वारे बंधनकारक केले असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यासंदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे
गत वर्षीपासून कोरोनामूळे जनसामान्यासह बळीराज्याचे जीवन मेटाकूटीला आले आहे.अश्यात आपल्या परिवाराचे पालन पोषन करायचे कसे ? हा यक्षप्रश्न सर्वासमोर ऊभा ठाकले.असे असतांना यंदाच्या या खरिप हंगामात कसाबसा उभा झाला.रोवणीही केली.निंदण खूरपण सुरु आहे.असे असतांना शासनाने"ई-पिक पाहणी" अॕप्सच्या माध्यमातून केली पिक पेऱ्याची नोंदणी करण्याच्या सूचना केल्या असताना युवा पर्व फाउंडेशन शेतकऱ्यांसाठी इथेही धावून आली शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप्स वर माहिती कशी बारावी याबाबतचे सर्व मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. तसेच युवा पर्वत फाउंडेशन महाराजांच्या विचारांवर पुढील वाटचाल करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुतळ्यास मानवंदना अशे बरेचसे उपक्रम राबविण्यात आले , युवा पर्व फाऊंडेशन एक सामाजिक संस्था असून त्यात सर्व युवा वर्ग कार्य करण्यास तत्पर असतो फाऊंडेशनने प्रत्येक सण उत्सव, वाढदिवस , तसेच महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळात स्तुत्य उपक्रम राबविले आहे
संस्थेचे ध्येय युवा होतकरू मुलांना मदत करणे , गडकिल्ले संवर्धन -जतन व आपणही समाजाचे,पर्यावरणाचे काही देने लागतो या उद्देशावर कार्य करणे अखंड पणे चालु आहे. कृषी विषयक व अन्य सामाजिक कामाबद्दल अधिक माहिती साठी ९९६०५३३८८९ या क्रमांकावर संपर्क करावा.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments