कमी पर्जन्‍यमानाच्‍या परिस्थितीत आपत्‍कालीन पिक नियोजन करावे

19 July 2019 07:37 AM


यावर्षी मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 34 टक्केच पाऊस पडला असुन सर्वदुर सारखा झालेला नाही, त्यामुळे पिक 
परिस्थिती समाधानकारक नाही. काही ठिकाणी अजुन पेरण्या बाकी असुन पावसाचा दीड महिन्याचा कालावधी जवळपास होत आला आहे. अशा परिस्थितीत पर्यायी पिके व पिकपध्दती आपत्कालीन पिक नियोजनात समाविष्ठ करुन पेरणी करणे सोईस्कर होईल, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ. यु. एन. आळसे यांनी दिला आहे.

पिकांची पेरणी योग्य पावसानुसार करावी. 16 ते 11 जुलै दरम्यान सुर्यफुल, बाजरी, सोयबीन + तूर, बाजरी + तूर, एरंडी, कारळ, तीळ, हुलगा, मटकी आदी पिकांची पेरणी करावी. कमी कालावधीच्या वाणाची निवड करावी, यात तूर (बीडीएन-711), सोयबीन (एमएयुएस-71, जेएस-9305), बाजरी (एबीपीसी-4-3, धनशक्ती), सुर्यफुल (एलएस-11, 35) वाणांचा वापर करावा.

तसेच 1 ते 15 ऑगस्ट दरम्‍यान बाजरी, सुर्यफूल, एरंडी, तीळ, एरंडी अधिक धने, एरंडी+तुर आदी पिकांची पेरणी करावी. तर 16 ते 31 ऑगस्ट दरम्‍यान बाजरी, सुर्यफुल, एरंडी, तीळ, एरंडी + तुर, एरंडी + धने आदींची लागवड करावी.

मुलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पध्दतीचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, अशा ठिकाणी अरुंद ओळीच्या खरीप सर्वच पिकांमध्ये 3-4 ओळी नंतर एक सरी काढावी व कापुस व तुर रुंद ओळीतील पिकांमध्ये एक तास आड करुन सरी काढावी जेणेकरुन पडलेला पाऊस सरीमध्ये साठून पिकाच्या वाढीसाठी उपयोगी पडेल, असा सल्‍ला त्‍यांनी दिला आहे.

emergency crop plan आपत्‍कालीन पिक नियोजन रुंद वरंबा सरी BBF Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ broad bed and furrow system बीबीएफ
English Summary: Conduct emergency crop plan in low rainfall conditions

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.