गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अनेकजण आत्महत्या करत आहेत.
आता सरकारकडून यंत्रणा राबवली जात असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सचिवांसह सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे पंचनामे केले जात आहेत.
या पावसात ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे, त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, की सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही.
दुधाचे दर आणखी वाढणार, दुधाच्या उत्पादनात घट
पंचनामे केल्यावरच आपल्याला किती नुकसान झाले ते समजेल. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतची माहिती आमच्याकडे येत आहे, असेही ते म्हणाले. नुकसानीचा आकडा लकरच कळेल, असेही ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३ कोटी १८ लाखांचे अनुदान वितरीत
साडेपाच हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारने आतापर्यंत दिली आहे. येणाऱ्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे सत्तार म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये.
महत्वाच्या बातम्या;
महत्वाच्या बातम्या;
माळेगाव कारखान्याला १० गावे जोडण्याच्या निर्णयाला प्रादेशिक सहसंचालकांची स्थगिती, संचालक मंडळाला मोठा धक्का
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा ऊसदर जाहीर
'बदलत्या वातावरण आणि तंत्रज्ञानाशी तरुणांना जोडण्यासाठी लघु उद्योग भारती कार्यरत'
Share your comments