शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता दूध दरात आजपासून वाढ करण्यात आली आहे. गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटरला एक ते दोन रुपयांनी वाढवून तो 37 ते 38 रुपये करण्यात आला आहे.
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गायीच्या दूध खरेदीची स्पर्धा अधिक झाली आहे. यामुळे आता सहकारी व खासगी दूध डेअर्यांनी गायीच्या दुधाच्या खरेदी दरात लिटरला एक ते दोन रुपये आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, दूध कल्याणकारी संघाची मंगळवारी सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यस्तरीय बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पातून मोठ्या बदलांची अपेक्षा, मोदी सरकाराने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे
या बैठकीस प्रमुख सहकारी व खाजगी 22 दूध ब्रॅंडच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. सध्या दूध खरेदी दर व अन्य पॅकिंग, ट्रान्स्पोर्टमध्ये वाढ झालेली आहे. यामुळे दरवाढ करणे गरजेचे होते.
असा तसा नाय! तब्बल १२ कोटींचा रेडा हाय, रेडा पाहून शेतकरी झाले थक्क
यावेळी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के म्हणाले, डेअरी व्यावसायिकांना बाजारपेठेत त्यांच्या दूध ब्रॅंडची पाऊच विक्री टिकवायची असेल दर वाढवावेच लागतील. यामुळे दूध दर दोन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय झाला.
महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! आता रेशीम शेतीसाठी एकरी एक लाखाचे कर्ज मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा
गाढवीनीच्या दुधातून कमवतायत बक्कळ पैसा, 1 लिटर दुधाची 5 हजारात विक्री
शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत! आता गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
Share your comments