अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे अनेकांची पिके जमीदोस्त झाली. अनेकांच्या बागा देखील उध्वस्त झाल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
असे असताना आता या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या उद्देशाने थेट मंत्रालयातून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मागील आठवड्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी पैसे उपलब्ध झाले आहेत.
याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढील ८-९ दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे वाटप करण्यात येईल. पावसाळा जवळ आल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान २.० ची कामे गतीने करा. त्याचबरोबर गाळमुक्त शिवार, गाळयुक्त शिवार योजना प्रभावी राबविण्यााच्या सुचना प्रशासनाला दिल्या.
सर्वाधिक एफआरपी थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये पहिले 2 कारखाने इंदापूरचे....
दरम्यान, आता शासनाने नवीन पद्धत अवलंबली आहे. त्यामध्ये आपत्तीनंतर पिकांचे पंचनामे करून निधी मागणी अहवाल संबंधित यंत्रणेमार्फत शासनाला पाठवण्यात येईल. त्यानंतर शासन निर्णय जाहीर होऊन तो ऑनलाइन निधी वितरण प्रणालीत समाविष्ट केला जाईल.
राज्यातील धरणांत ३० टक्के पाणीसाठा, लवकर पाऊस नाही पडला तर...
नुकसानग्रस्तांची माहिती अपलोड झाल्यानंतर शासन त्यांच्या बॅंकखात्यात थेट मंत्रालयातून रक्कम जमा करण्याची कार्यवाही करेल. यामुळे यासाठी जास्त वेळ लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे.
दूध उत्पादनात 15-20 टक्के घट, पशुपालक चिंतेत..
बैलगाडा शर्यतींचे आयोजन करताना सरकारकडून नवीन नियमावली जाहीर, वाचा नियम, ५ लाखांचा दंड...
पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बालाजी खैरे तर उपसभापतीपदी रुख्मीनबाई पिसाळ यांची निवड!
Share your comments