जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस थोडा मंदावला होता पण गेल्या पंधरा दिवसा पासून पावसाने जोर पकडला आणि यामुळे शेती कामाला जोर आला व आपला बळीराजा सुखावला. भारतीय सरकारने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी १७.३६% पेक्षा जास्त भात जमीन गेल्या वर्षाच्या तुलनेत पेरणी करण्यात आली. तेल बियाणांची पेरणी १५. ५० % पेक्षा जास्त पेरणी झाली आहे.
भारतात यावर्षी बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला. भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि शेतीसाठी भरपूर भाग पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे भारतात १० % पेक्षा जास्त भाग गेल्या वर्षाच्या तुलनेत पेरणीसाठी उपयोगात आणण्यात आला.
महाराष्ट्रातील पश्चिम घाटात भात शेती केली जाते आणि या पीकासाठी पाण्याची फार गरज आहे. पण चांगल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांना एकच चिंता भेडसावत आहे आता पावसाचा जोर कायम आहे पण मधेच पावसाने हुलकावणी दिली तर पिकाला रोगाची लागवण होऊ शकते. कारण पाऊस पडला नाही तर अनेक किडींचे अतिक्रमण होत असते. जर किडींचा प्रादुर्भाव वाढला तर उत्पादनात घट होण्याची शक्यता अधिक आहे.
Share your comments