काळाच्या ओघात शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून उत्पादनात वाढ कशी करायची या कामात आहे. बिहारमध्ये मात्र पिवळा, पांढरा तसेच केशरी रंगाच्या फुलकोबीची लागवड तेथील शेतकरी करत आहेत. सर्वसामान्य फुलकोबी पेक्षा या फुलकोबी ची किमंत सुद्धा जास्त आहे त्यामुळे हा कोबी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देण्याचे काम करत आहे. तर काही शेतकऱ्यांनी शेतात प्रयोग करून यामधून यश प्राप्त केले आहे आणि आता हे शेतकरी फुलकोबी चे क्षेत्र वाढवण्याच्या मार्गावर आहेत. केंद्रीय कृषी विश्व विद्यालयाचे प्राध्यापक-सह-संचालक डॉ. राजेंद्र प्रसाद, प्राध्यापक डॉ. एस. के. सिंग हे शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करत आहेत. बिहारमधील हे प्रयोग बघून इतर लोकांना आश्चर्य वाटले आहे. बिहारमधील जे प्रयोगशील शेतकरी आहेत ते अनेक दिवसांपासून अशी शेती करत असल्याचे समजत आहे.
जाणून घ्या रंगीबेरंगी फुलकोबीबाबत :-
बिहारमध्ये पिवळ्या कोबीची लागवड केली जात आहे जे की यास कॅरोटीना असे म्हणतात तर गुलाबी व जांभळा कोबी हा अल्ंटिला आहे. हे दोन्ही कोबी आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत तसेच कॅन्सर पासून बचाव करतात असे डॉ.एस.के. सिंह यांचे मत आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडील या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरून शेतकरी रंगीत कोबीची बियाणे खरेदी करून शकतात. तुम्ही जर सुरुवातीला याचा प्रयोग करत असाल तर प्रथम कमी प्रमाणात तुम्हाला लागवड करावी लागणार आहे. एकदा की पहिला टप्पा तुम्ही पार पाडला की नंतर तुम्ही हळुवारपणे मोठ्या प्रमाणत लागवड करावी जे की हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. आपण सर्वसामान्य कोबी ची ज्या प्रकारे लागवड करतो त्याचप्रकारे रंगीबेरंगी कोबीची लागवड करावी.
बिहारमधील शेतकरी वाढवतायत रंगीबेरंगी शेतीचे क्षेत्र :-
देशात बिहारमधील शेतकरी आपल्या शेतात अनोख्या प्रकारचा प्रयोग करून सर्वांचे लक्ष केंद्रित करून घेण्याचे काम करत आहेत. जे की तिथे जे पहिल्यापासून आपल्या शेतात विविध प्रयोग करतात ते शेतकरी खूप दिवसापासून आपल्या शेतात रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड करत आहेत जे की यामधून चांगले उत्पन्न निघत आहे हे तेथील आसपासच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आले असल्याने तेही शेतकरी आपल्या शेतात या कोबीची लागवडीचा प्रयोग करत आहे त्यामुळे हळूहळू रंगबिरंगी फुलकोबीची क्षेत्र वाढतच निघाले आहे.
रोगप्रतिकार शक्तीही वाढते :-
रंगीबेरंगी कोबीमध्ये vitamin A आढळते ज्यामुळे आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती मोठया प्रमाणात तयार होते तसेच या कोबीमध्ये vitamin C देखील असते. बागानी कोबीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि कॅल्शियम क्लोराईड असते जे आपल्या पचन शक्तीला नियंत्रित करण्याचे काम करते व जीवनसत्त्वे सुद्धा चांगल्या प्रकारे देते. ब्रिटन तसेच फ्रान्स मध्ये रंगीबेरंगी कोबी ची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते जे की या कोबीमध्ये आपल्याला शरीराला लागणारी सर्व प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात.
Share your comments